PM नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका, भाजपच्या रॅलीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

PM नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका, भाजपच्या रॅलीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

दिल्लीत अनधिकृत वसाहती नियमित करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाने मेगा रॅलीचं आयोजन केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : पाकिस्तानमध्ये स्थित दहशतवादी संघटना 22 डिसेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीवर हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. यंत्रणांनी दिलेल्या या माहितीनंतर सगळीकडे अलर्ट करण्यात आलं असून सुरक्षा समूह आणि दिल्ली पोलिसांना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत अनधिकृत वसाहती नियमित करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाने मेगा रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी 22 डिसेंबरला रामलीला मैदानावर पोहोचणार आहेत.

केंद्रीय सुरक्षा संस्थानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठई ब्लू बुकमधील सर्व सूचना आमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचत भारतात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांना एक करत आहे. जिथे सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि माध्यमांची नजर असेल अशा ठिकाणी हल्ला करण्याचा प्लान दहशवादी करत आहेत.

रामलीला मैदानावरील सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि दिल्ली पोलीस दोघेही जबाबदार असणार आहेत. मोदी यांच्यासह एनडीएचे विविध मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री या मोर्चात उपस्थित असतील. त्यामुळे कठोर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

मोदींच्या अलीकडील निर्णयांमुळे धोका वाढला

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांनी मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. असे म्हटले जाते की, 12 डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) , 9 नोव्हेंबरला राम जन्मभूमी निकाल आणि 5 ऑगस्ट रोजी काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविल्यापासून पंतप्रधानांना जास्त धोका होता. याशिवाय पाकिस्तानमधील बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या विध्वंसमुळे दहशतवादी संघटनाही संतापल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या बाजूने होणारा हल्ला नाकारता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading