नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : ISIS या दहशतवादी संघटनेच्या समर्थकांचं जाळं उद्धवस्त करण्यासाठी NIAने देशभरात मोठी कारवाई केलीय. NIAच्या पथकाने देशभरातल्या 20 ठिकाणी छापे घातले असून संशयीत ठिकाणांवरून आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त केले आहेत. यामधून NIAला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हे छापे घालण्यात आले आहेत. या आधीही NIAने अशा प्रकारची कारवाई केली होती. केरळ आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात छापे घातले होते. गेली काही वर्षी सीमी आणि इतर कट्टर संघटना या ISISशी संधान साधून देशात घातपाती कारवाया करण्याचा कट आखत आहेत मात्र त्यांना त्यात यश आलेलं नाही.
या आधीही महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे कट उघडकीस आले होते. त्यात काही जणांना अटकही करण्यात आली होती. त्यात अनेक उच्च शिक्षित तरुणांचाही समावेश होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांना कट्टरतावादाकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातोय. ISISचे हँडलर्स या तरुणांचा संपर्कात राहतात. त्यांना पैसेही पुरवले जातात.
या तरुणांचे डोके भडकाऊन त्यांना घातपाती कृत्यांसाठी तयार केलं जातं. अशा कामासाठी या संघटनांनी स्लिपर सेलही तयार केले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबई जवळच्या उपनगरातूनही काही तरुण सीरीयात गेल्याचंही उघड झालं होतं.
National Investigation Agency (NIA) is conducting raids at more than 20 locations in Karnataka and Tamil Nadu, in connection with ISIS conspiracy cases. pic.twitter.com/b48HufG62D
— ANI (@ANI) February 24, 2020
हेही वाचा...
ठाकरे सरकार अकरा दिवसांत कोसळेल, नारायण राणेंचं भाकीत
धक्कादायक! प्रसिद्ध कंपनीच्या ताकामध्ये आढळले बुरशीसारखे पदार्थ