एल्गार परिषद : NIAची राज्य सरकारवर कुरघोडी, पुणे सत्र न्यायालयात केला अर्ज

एल्गार परिषद : NIAची राज्य सरकारवर कुरघोडी, पुणे सत्र न्यायालयात केला अर्ज

NIAने कायदेशीर लढाई करण्यासाठी पुणे सत्र न्यायालायात अर्ज दाखल केला आहे

  • Share this:

पुणे, 30 जानेवारी : एल्गारचा तपास ताब्यात घेण्यासाठी आता एनआयएने पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आतापर्यंत एल्गार प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत होते. आता हा तपास एनआयएकडे येण्यासाठी केंद्र सरकारने राज्य गृहमंत्रालयाकडे अर्ज केला होता. मात्र या अर्जावर कुठलाच निर्णय न घेतल्याने एनआयएने दुसरा मार्ग निवडला आणि कायदेशीर लढाई करण्यासाठी पुणे सत्र न्यायालायात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता पुणे पोलीस आणि आरोपीचे वकील त्यांची बाजू मांडतील. मात्र पुणे पोलीस नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहण महत्वाच ठरणार आहे. कारण पुणे पोलिसांना महासंचालक कार्यालयाकडून याबाबत कुठलेही आदेश आलेले नाहीत आणि जोपर्यंत याबाबतचे आदेश येत नाहीत तोवर तपास आणि कागदपत्र देता येणार नाही अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली होती. पुणे सत्र न्यायालयात राज्य सरकारची भूमिका वकील मांडतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. एल्गार परिषद प्रकरणात तपासासाठी एनआयएला कागदपत्र हवे आहेत. यासंदर्भात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. आज या संदर्भात वकील यांच्याशी चर्चा ही करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

First published: January 30, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या