Home /News /national /

BREAKING : राहुल गांधींची 8 तास चालली चौकशी, ईडीने उद्या पुन्हा बोलावलं!

BREAKING : राहुल गांधींची 8 तास चालली चौकशी, ईडीने उद्या पुन्हा बोलावलं!

राहुल गांधी हे ईडी कार्यालयातून निघाले आहे. उद्या पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

राहुल गांधी हे ईडी कार्यालयातून निघाले आहे. उद्या पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

राहुल गांधी हे ईडी कार्यालयातून निघाले आहे. उद्या पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

    नवी दिल्ली, 13 जून : नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची आज ईडीने (ed) तब्बल 8 तास चौकशी केली. त्यानंतर आता पुन्हा उद्या मंगळवारी राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आल्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहे. त्यामुळे उद्याही निदर्शनं करण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज राहुल गांधी यांची चौकशी झाली. दुपारी 12 वाजेपासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत अशी एकूण साडे आठ तास त्यांची ईडी चौकशी झाली. यामध्ये त्यांची पहिल्या सत्रात 3 तास आणि दुसऱ्या सत्रामध्ये साडे पाच तास चौकशी झाली आहे. मात्र आता पुन्हा उद्या मंगळवारीही ही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. राहुल गांधी हे ईडी कार्यालयातून निघाले आहे. उद्या पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, आज राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार हे कळताच देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेल्याचे पाहायला मिळाले.  देशभरात दिल्लीसह मुंबई आणि राज्याच्याही इतर भागामध्ये काँग्रेसनं आंदोलनं केली. तर ईडीच्या कार्यालयाबाहेरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या धरल्याचं पाहायला मिळालं. इकडे मुंबईतही काँग्रेसचे महत्वाचे नेते, मंत्री, कार्यकर्ते  सगळेच रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाल्यानं अनेक दिवसांनी काँग्रेस जिवंत असल्याचंच पाहायला मिळालं. (International Yoga Day 2022: गायक व्हायचंय? सुरेल आवाजासाठी करा 'हा' योगाभ्यास) केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचं सांगत काँग्रेस विरोधात मुद्दामहून ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.यापुढे ईडीचा असाच वापर सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरू असा ईशाराही आंदोलकांनी दिला. काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? 1938 मध्ये काँग्रेसने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज घेतले.   90 कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली.  यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल, सोनियांची हिस्सेदारी 38-38% टक्के आहे. एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले.  शेअर्सच्या बदल्यात यंग इंडिया एजेएलचं कर्ज फेडणार आहे. देशातील मोक्याच्या जागांवर कमी किमतीत ऑफिससाठी जागा आहे. मुंबई, दिल्ली शहरातील मोक्याच्या जागांचं भाडं AJLला मिळत होतं. या जागांचे मूल्य 2 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली.  50 लाखांच्या मोबदल्यात यंग इंडिया कंपनी 2 हजार कोटींची मालक झाले. याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात सुब्रह्मण्यम स्वामींचा खटला दाखल केला.  गांधी कुटुंबाकडून नॅशनल हेराल्डच्या संपत्तीच्या गैरवापराचा आरोप केला गेला. मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबेस सॅम पित्रोदाही आरोपी आहे.  26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडून समन्स जारी केला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पटियाला कोर्टाकडून सर्व आरोपींना जामीन मिळाला.  फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरोपींविरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली. मे 2019 मध्ये, ईडीने 64 कोटींची मालमत्ता जप्त केली. 1 जून 2022 चौकशीसाठी ईडीने सोनिया, राहुल गांधींना समन्स बजावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या