शिमला 6 सप्टेंबर: राष्ट्रीय शिक्षण प्रबोधिनीच्या म्हणजेच National Defence Academyच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सोय म्हणून सरकारने ट्रेनची सोय केली. मात्र या अख्ख्या ट्रेनमध्ये फक्त 2 विद्यार्थी आलेत. अख्खी ट्रेन रिकामीच आली. आता या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रविवारी 6 सप्टेंबरला ही परीक्षा झाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. देशातल्या अनेक ठिकाणी या ट्रेन्स सोडण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची स्थिती बघता अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेले नाही हे समोर आलं.
कालका- शिमला ट्रेन ही सोलनहून शिमल्याला आली होती. या सर्व ट्रेनमध्ये फक्त 2 जण आले होते.
#WATCH: Two passengers arrived in Shimla from Solan via Kalka-Shimla railway line, the services which began today, to write National Defence Academy (NDA) exam. #HimachalPradesh pic.twitter.com/605iE6ngmL
— ANI (@ANI) September 6, 2020
NDA सोबतच NEET आणि JEEच्या परीक्षाही होत आहेत. या परीक्षा घ्याव्यात की नाही यासाठी मोठं आंदोलन झालं होतं. प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं होतं मात्र कोर्टाने या परीक्षांना परवानगी दिल्याने या परीक्षा होत आहे.