Elec-widget

महाराष्ट्रातल्या धरणफुटीची नरेंद्र मोदींनी घेतली दखल, हा घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातल्या धरणफुटीची नरेंद्र मोदींनी घेतली दखल, हा घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातल्या धरण फुटीच्या घटनेमुळे केंद्र सरकार जागं झालं असून देशपातळीवर कायदा तयार करण्यात येणार आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास 17 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. बैठकीमध्ये देशातल्या धरणांच्या सुरक्षेचासाठी कायदा तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. कोकणातील तिवरे धरण फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे  सरकार जागृत झालंय. खबरदारीचा उपाय म्हणून  धरणांच्या सुरक्षिततेकरिता हा कायदा करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली.

VIDEO : हाफिज सईद अटक प्रकरणावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय

- 15 व्या वित्त आयोगाला एक महिन्याची मुदत वाढ देण्यात आलीय.

- अलाहाबाद ते पंडित दीनदयाळ (मुगल सराय) ही नवीन रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे.

Loading...

- न्यु बोगाई गाव येथे  नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे नॅशनल मेडिकल कमिशनच्या विधयेकचा मसुदा मंजूर करण्यात आला आहे.

- वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक्सिडं   परीक्षा होणार आहे.

- धरण सुरक्षा विधेयक मसुदा मंजूर करण्यात आला आहे.

VIDEO: 15 दिवसांत शेतकऱ्यांची पिक विमा द्या, नाहीतर...उद्धव ठाकरेंचा इशारा

नेमकं काय झालं होतं?

तिवरे धरण 1 जुलै रोजी मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास फुटले. धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंडेवाडी वाहून गेली. बचाव पथकाला 19 मृतदेह शोधण्यात यश आलं. काहीजण बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होतं मात्र त्यात यश आलं नाही. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश होता. राज्य सरकारने धरण का फुटलं याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समितीचं गठण केलंय. खेकड्यांमुळे धरणाला भेगा गेल्या असाव्यात असा अंदाज एका मंत्र्यांनी व्यक्त केल्यानंतर मोठं राजकरण निर्माण झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...