'CCD'चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ बेपत्ता; प्रवासावेळी नदीच्या पुलावर उतरले आणि...

'CCD'चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ बेपत्ता; प्रवासावेळी नदीच्या पुलावर उतरले आणि...

VG Siddhartha : 'कॅफे कॉफी डे'चे (CCD) मालक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून (29 जुलै) संशयास्पदरित्या बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मोबाइल फोनदेखील बंद येत आहे.

  • Share this:

बंगळुरू, 30 जुलै : 'कॅफे कॉफी डे'चे (CCD) मालक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून संशयास्पदरित्या बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मोबाइल फोनदेखील बंद येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते एसएम कृष्णा यांचे जावई आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ 29 जुलैला मंगळुरूच्या दिशेनं प्रवास करत होते. प्रवासादरम्यान नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांनी आपली कार थांबवली आणि बाहेर येऊन परिसरात फिरत होते. यानंतर बराच वेळ उलटल्यानंतरही सिद्धार्थ परतलेच नाहीत. सोमवारी (29 जुलै)संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. कॉफी किंग व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी कन्नड पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि कोस्ट गार्डची मदत घेतली आहे. जवळपास 200 जण त्यांचा शोध घेत आहेत. यादरम्यानच मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली.

(वाचा : तारीख ठरली! साताऱ्याचे 'राजे' लवकरच भाजपमध्ये, 'हे' 3 आमदारही सोडणार आघाडीची साथ)

CCDचे व्ही.जी. सिद्धार्थ बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी आपली कार घेऊन घरातून बाहेर पडले होते. प्रवासावेळी मंगळुरूजवळच्या नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांनी आपली कार थांबवली आणि ते उतरले. हे ठिकाणी बंगळुरूपासून जवळपास 375 किलोमीटर अंतरावर आहे. तासाभरानंतरही जेव्हा सिद्धार्थ माघारी परतले नाहीत, तेव्हा त्यांच्या चालकाला चिंता वाटू लागली. चालकानं आसपासच्या परिसरात मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. यानंतर तणावात आलेल्या चालकानं सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांना फोनवरून घडल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसात धाव घेतली.

(वाचा :दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’)

सिद्धार्थ फोनवर कोणाशी बोलत होते?

चालकानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असताना सिद्धार्थ बराच वेळ फोनवर कोणासोबत तरी बोलत होते. यानंतर नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांनी कार थांबवण्यास सांगितले आणि खाली उतरले. त्यानंतर ते बेपत्ताच झाले. चालकानं दिलेल्या माहितीवरून पोलीस आता सिद्धार्थ यांचे फोन रेकॉर्ड तपास आहेत, जेणेकरून बेपत्ता होण्यापूर्वी त्यांचे कोणाकोणाशी बोलणं झालं होतं हे समजू शकेल आणि शोधकार्यात मदत होईल.

(पाहा :VIDEO: पुण्यातील बहुचर्चित बलात्कार-खूनप्रकरणी आरोपींची फाशीची शिक्षा रद्द!)

सिद्धार्थ यांच्याकडे आहेत कॉफीच्या बागा

आशियामध्ये प्रसिद्ध असलेली कॉफी इस्टेट कंपनी 'कॅफे कॉफी डे' चे मालक संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांचं कुटुंब 150 वर्षे जुनी कॉफीच्या शेती संस्कृतीसोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे कॉफीच्या बागा आहेत. 90 च्या दशकात कॉफीचं मुख्यतः दक्षिण भारतातच घेतले जाते होते. विशेषतः येथील कॉफीला पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रचंड मागणी होती. सिद्धार्थ यांना ही कॉफी सर्वदूर पोहोचवण्याची इच्छा होती.  सिद्धार्थ यांचे परिश्रम आणि त्यांचा कौटुंबिक कॉफीचा व्यवसाय यामुळेचे 'कॅफे कॉफी डे'चं स्वप्न सत्यात उतरू शकले.

...आणि 'कॅफे कॉफी डे'चं स्वप्न झालं पूर्ण

'कॅफे कॉफी डे'ची सुरुवात जुलै 1996मध्ये बंगळुरूतील बिग्रेड रोड येथील पहिलं कॉफी शॉप इंटरनेट कॅफेपासून झाली. यानंतर CCDनं देशभरात 'कॅफे कॉफी डे'च्या रुपात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आताच्या घडीला देशभरात 247 शहरांमध्ये सीसीडीचे एकूण 1 हजार 758 कॅफे शॉप आहेत.

पुण्यातील 'या' बँकेने थकवले 9 कोटी रुपये, भाजपच्या मंत्र्यामुळे कारवाई नाही?

First published: July 30, 2019, 10:07 AM IST
Tags: coffee

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading