S M L

चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नाही - सुप्रीम कोर्ट

चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नाही, हा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलाय. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याबाबतची आपली भूमिका केंद्र सरकारने बदलली.

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2018 01:18 PM IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नाही - सुप्रीम कोर्ट

09 जानेवारी : चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नाही, हा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलाय. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याबाबतची आपली भूमिका केंद्र सरकारने  बदलली. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक केल्याच्या नियमात बदल करण्याची आपली तयारी असल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यासाठी मंत्र्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केल्याची माहितीही केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला दिली होती.

या प्रकरणाबाबत समितीची शिफारस आल्यानंतर लगेचंच पुढील निर्णय घेण्यात येईल असं केंद्र सरकारनं कोर्टाला सांगितलं. ५ डिसेंबरला या समितीची स्थापना करण्यात आली. दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ आज या प्रकरणावरील सुनावणी घेणाराय. जोपर्यंत समितीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशात अंतरिम बदल व्हावा अशी विनंती केंद्र सरकारनं कोर्टाला केली.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याबाबत सरकार मार्गदर्शक तत्त्वे का बनवत नाही, असं सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावरील मागील सुनावणीदरम्यान सरकारकडे विचारणा केली होती. राष्ट्रगीत गायले नाही, तर कुणी राष्ट्रद्रोही होत नाही असे २३ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्ट म्हणाले होते. देशभक्ती दाखवण्यासाठी ना राष्ट्रगीत गाण्याची आवश्यकता आहे ना दंडावर पट्टा लावण्याची गरज अशी टीप्पणीही सुप्रीम कोर्टाने त्यावेळी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close