VIDEO: कपड्यांवरून मुंबईच्या तरुणीला भररस्त्यात दिले संस्कृतीचे धडे, तिनं शिकवला चांगलाच धडा

VIDEO: कपड्यांवरून मुंबईच्या तरुणीला भररस्त्यात दिले संस्कृतीचे धडे, तिनं शिकवला चांगलाच धडा

हल्ली कोणीही उठून स्वयंघोषित संस्कृती रक्षक होऊ लागला आहे. संस्कृतीचे धडे देण्याच्या नावाखाली दादागिरी सुरू असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

बंगळुरू, 7 ऑक्टोबर : हल्ली कोणीही उठून स्वयंघोषित संस्कृती रक्षक होऊ लागला आहे. संस्कृतीचे धडे देण्याच्या नावाखाली दादागिरी सुरू असल्याचं दिसत आहे. अशाच एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाचा चीड आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तरुणीला भारतीय संस्कृती, संस्कार आणि नैतिकतेचे धडे देताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट्स आणि टी-शर्ट परिधान केलेली एक तरुणी आपल्या मित्रासोबत बाईकवरून प्रवास करत होती. त्यावेळेस या दोघांच्या शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कारण काय तर म्हणे तरुणीनं परिधान केलेले कपडे त्याच्या म्हणण्यानुसार योग्य नव्हते.

संताप आणणारा हा व्हिडीओ बंगळुरूतील असल्याचं म्हटलं जात आहे. गुरुवारी रात्री एएसआर लेआउट परिसरात ही घटना घडली. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा स्वयंघोषित संस्कृती रक्षक व्यक्ती तरुणीला तिनं परिधान केलेल्या कपड्यांवरून तिला नको-नको ते ऐकवत होता. शिवाय तिला भारतीय संस्कृतीचं पालन करण्यासही सांगत होता. इतकंच नाही तर तो तिच्यावर अंगावर मोठमोठ्यानं ओरडत होता. तरुणींच्या मित्रानं या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाइलवर शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

स्वयंघोषित संस्कृती रक्षकाचा आरडाओरडा

तरुणीनं 'द न्यूज मिनट'सोबत संवाद साधताना सांगितलं की, कोणीतरी माझ्या अंगावर ओरडत असल्याचं मला जाणवलं. मान वळवून पाहिलं तर दुचाकीवर असलेला एक जण माझ्यावर ओरडून विचारत होता की, तुझ्या घरी कपडे नाहीत का?. यावर, तुम्हाला काय त्रास आहे? असं मी त्याला विचारलं. तर तो तिला भारतीय संस्कृतीचे धडे देऊ लागला. भारतीय महिला असे कपडे परिधान करत नाहीत. दरम्यान, ही तरुणी मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मित्रानं केला कडाडून विरोध

तरुणीच्या मित्रानंच या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाइलवर चित्रित केला. संस्कृतीचे धडे देणाऱ्या या व्यक्तीला तरुणानं चांगलेच खडेबोल सुनावले. व्हिडीओ चित्रित होत असल्याचं समजताच स्वयंघोषित संस्कृती रक्षकाचा आवाज कमी झाला. तसंच तुझ्या दादागिरीची पोलिसात तक्रार करणार असल्याचं सांगताच, त्यानं लगेचच तिथून पळ काढला.

CCTV VIDEO: सुरक्षारक्षकांनी ACZमध्ये जाण्यास रोखलं; तरुणांनी केली बेदम मारहाण

Published by: Manoj Khandekar
First published: October 7, 2019, 4:52 PM IST
Tags: Bangalore

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading