अबब! पावती फाडण्याचा रेकॉर्ड, ट्रक चालकाविरोधात 6 लाखांची दंडात्मक कारवाई

अबब! पावती फाडण्याचा रेकॉर्ड, ट्रक चालकाविरोधात 6 लाखांची दंडात्मक कारवाई

एका ट्रक चालकाविरोधात सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

भुवनेश्वर, 14 सप्टेंबर : देशभरात 1 सप्टेंबर 2019पासून नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. यादरम्यानच, ओडिशामध्ये एका ट्रक चालकाविरोधात सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ओडिशामध्ये शैलेश शंकर लाल गुप्ता या ट्रक चालकाविरोधात वाहतूक परिवहन विभागानं तब्बल 6 लाख 53 हजार 100 रुपयांची पावती फाडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक गुप्तानं गेल्या पाच वर्षांपासून वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. एकूण सात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुप्ताविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच गेल्या पाच वर्षांपासून त्यानं टॅक्सदेखील भरलेला नाही. ध्वनी, वायू प्रदूषण, विना परवाना गाडी चालवणं यांसह सामान्य नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड गुप्ताला ठोठावण्यात आला आहे.

(वाचा :आधार कार्डातल्या 'या' 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्रं)

दिल्लीतही ठोठावला होता 2 लाखांचा दंड

यापूर्वी राजधानी दिल्लीतही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. येथे एका ट्रकचालकाविरोधात 2 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. ट्रक चालकाचं नाव राम किशन असं होतं. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 2 लाख 500 रुपयांचा दंड त्याला भरावा लागला.

(वाचा : आता वाहतुकीचे नियम मोडणं पडणार महागात, वाचा काय झालेत बदल)

वाहतुकीचे नवीन नियम

1.वाहतुकीचा कोणताही नियम भंग केला तर किमान दंड 500 तर कमाल दंड 25 हजार रुपये आणि तीन वर्षे तुरुंगवास इतका आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनी नियम तोडले तर त्याची शिक्षा पालक आणि वाहन मालकांना भोगावी लागणार आहे.

2. वाहन चालवताना परवाना असणे बंधनकारक आहे. तो नसल्यास 500 रुपये दंड आकारला जात होता. यापुढे तो 5 हजार इतका होणार आहे. तसेच वेगाची मर्यादा ओलांडल्यास 400 रुपयांवरून 2 हजार इतका दंड द्यावा लागणार आहे.

3.वाहतूक नियमांचा भंग केल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्याशिवाय प्रशासनाचा आदेश भंग केला तर आता 2 हजार रुपयांचा दंड कऱण्यात येईल. तसेच विमा नसेल किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती दुचाकीवर असतील या दोन्ही नियमांसाठी दोन हजार रुपयांचा दंड होईल.

4. परवाना जवळ न बाळगता वाहन चालवणं, धोकादायक अवस्थेतील वाहन चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी आधी 500 ते 1000 रुपये दंड भरावा लागत होता.

5. पात्र नसताना, परवाना काढला नसताना वाहन चालवल्यास, मद्यपान करून वाहन चालवल्यास, अॅम्ब्युलन्सला वाट न देणे यासाठी नव्या नियमानुसार 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

(वाचा : ...तर मग पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्या, रामदास आठवलेंनी पाकिस्तानला ठणकावलं)

पाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या