पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात; आत्मघाती हल्लेखोराला दिले होते प्रशिक्षण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात; आत्मघाती हल्लेखोराला दिले होते प्रशिक्षण

पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड गाजी राशिद आणि कामरान या दोघांची नावे समोर येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड म्हणून गाजी राशिद आणि कामरान या दोघांची नावे समोर येत आहेत. हे दोघे ही जैश-ए-मोहम्मदचे कमांडर होते आणि त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतरच आत्मघाती हल्ला केला होता. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले.

पाहा: 'कुणी नाही वाचलं', Pulwama Attack चा काही क्षणानंतरचा EXCLUSIVE VIDEO

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात पुंछ मार्गे जैश-ए-मोहम्मदचे 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. या दहशतवाद्यांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. काश्मीरमधील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने काही उपकरणे आणि अन्य स्फोटके देखील आणली होती. तर 28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते.

वाचा: 7 मार्चला जवानाचं लग्न होतं...वडिलांना पत्रिका वाटतानाच मिळाली मुलाच्या मृत्यूची बातमी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा आयईडी एक्सपर्ट होता. राशिद आणि त्याचा दोन साथीदारांनी डिसेंबरमध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्ये लपले होते.

जैशने त्याचा कमांडर राशिदला काश्मीरमध्ये हल्ला करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती आता गुप्तचर विभागाने दिली आहे. काश्मीरमध्ये हल्ला करताना स्थानिक युवकाचा वापर केला जावा अशी जैशची योजना होती. गेल्या वर्षभरात दहशतवादाच्या मार्गावर केलेल्या अनेक युवकांना ऑपरेशन ऑलआउटमध्ये ठार मारण्यात आले आहे. यात जैशचा कमांडर मसूद अजहरच्या बहिणीचा मुलगा तल्हा आणि भावाचा मुलगा उस्मान या दोघांचा समावेश आहे. या दोघांना भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्ये ठार मारले होते.

वाचा: कोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना! कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार

सूत्रांच्या मते पुलवामा हल्ल्यात काश्मिरी युवकांचा यासाठी वापर केला गेला. जेणेकरून अन्य काश्मिरी युवक देखील जिहादसाठी तयार होतील आणि भारतात आत्मघाती हल्ले करतील.

LIVE VIDEO : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचं दर्शन, पाकलाही भरेल धडकी

First published: February 17, 2019, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading