कर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच ! आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान

कर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच ! आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान

Karnataka : कर्नाटकातलं राजकीय नाटक संपुष्टात येण्याच नावच घेत नाहीय.

  • Share this:

बंगळुरू, 23 जुलै : कर्नाटकातलं राजकीय नाटक संपुष्टात येण्याच नावच घेत नाहीय. सोमवारी (22 जुलै )देखील रात्री उशिरापर्यंत विधानसभेत काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांचा गदारोळ सुरूच होता. भाजप आमदार विश्वासदर्शक ठराव प्रस्तावावरील मतदानावर अडून राहिले होते. प्रचंड गदारोळामुळे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं आणि मंगळवारी (23 जुलै ) संध्याकाळी  6 वाजेपर्यंत  कोणत्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत.

(पाहा :SPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान!)

यानिमित्तानं आज पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा कुमार स्वामी सरकारला संधी देण्यात आली आहे.  सोमवारी सकाळी 11 वाजता सभागृहाचे सुरू झालेलं कामकाज तब्बल रात्री 11.45 वाजेपर्यंत चाललं. सोमवारी दिवसभरात आरोप-प्रत्यारोपांनी   सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. अखेर रात्री 11.30 वाजेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी (23 जुलै) रात्री 8 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव संमत करतो, असं म्हटल्यावर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी नकार दिला. तसंच मंगळवारी संध्याकाळी  6 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत.

(पाहा :SPECIAL REPORT : अमेरिकेत इम्रान खान यांचं 'मान न मान मैं तेरा मेहमान'!)

विशेष म्हणजे काल 11.45 वाजेपर्यंत कामकाज चालल्यानंतर सभागृहात काँग्रेस आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. बंडखोर आमदार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मतदान घेऊ नका, अशी काँग्रेस आमदारांची मागणी होती. तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये अनेकांना मधुमेह आणि रक्तदाबामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे जेवणा केल्याशिवाय सभागृहात उपस्थित राहू शकत नाही म्हणून सभागृह तहकूब करावे, अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडले, अखेर मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात आजचा दिवस पुन्हा एकदा महत्त्वाचा असणार आहे.

(पाहा :SPECIAL REPORT : वडिलांच्या वाढदिवसाला पार्थ पवारांच्या हाती झाडू!)

VIDEO : भररस्त्यावर भांडणं आणि चाकूने वार करून तरुणाला संपवलं

First published: July 23, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading