VIDEO : भारतीय नारी पाकिस्तान्यांवर भारी, तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना महिला पत्रकार एकटी भिडली

VIDEO : भारतीय नारी पाकिस्तान्यांवर भारी, तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना महिला पत्रकार एकटी भिडली

तिरंग्याचा अपमान करणाऱ्या पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांविरोधात भारतीय महिला पत्रकार एकटी भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

लंडन, 16 ऑगस्ट : तिरंग्याचा अपमान करणाऱ्या पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांविरोधात भारतीय महिला पत्रकार एकटी भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशासाठी महिलेनं दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना लंडनमधील असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील भारतीय उच्चायोगबाहेर स्वातंत्र्य दिनीचा जल्लोष सुरू होता. ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर काही वेळानं पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थक येथे पोहोचले आणि त्यांनी भारताविरोधात निदर्शनं करण्यास सुरुवात केली. निदर्शनं सुरू असतानाच या लोकांनी भारताच्या तिरंग्याचा अपमान केला. तेथे उपस्थितीत असलेल्या भारतीय महिला पत्रकार पूनम जोशी यांनी यास कडाडून विरोध केला. त्या एकट्याच या सर्वांविरोधात भिडल्या आणि तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांच्या हातून झेंडा हिसकावून घेतला.

(वाचा : वासनांध बापानं 2 वर्षे मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर शरीराचे केले तुकडे)

ANIनं दिलेल्या वृत्तानुसार, स्वातंत्र्य दिनाचं वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार पूनम जोशी येथे पोहोचल्या होत्या. यावेळेस पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांकडून निदर्शनं सुरू होती. खलिस्तानी आपल्या तिरंग्याचा अपमान करत होते. हे पाहून पूनम जोशी खवळल्या आणि त्यांच्याकडून आपला तिरंगा खेचून घेतला. पूनम जोशींनी दाखवलेल्या धाडसाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि पूनमवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पूनम यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला पाहिजे, असे मत नेटिझन्सनी व्यक्त केलं आहे.

(वाचा :धक्कादायक! लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट, 63 जणांचा जागीच मृत्यू)

महाकाय खड्ड्यांबाबत प्रशासनाला उशिरा शहाणपण, 28 पुलांचं होणार ऑडिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 01:14 PM IST

ताज्या बातम्या