VIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बहरीनमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना संबोधित करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 10:37 AM IST

VIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बहरीनमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना संबोधित करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'माझ्या मनात मोठं दुःख आहे. मी इतक्या दूरवर आहे आणि माझा मित्र अरुण मला सोडून गेलाय. खूप कठीण प्रसंग आहे. एकीकडे मी कर्तव्यांनी बांधलो गेलो आहे आणि दुसरीकडे भावनांनी', अशा शब्दांत मोदींनी आपलं दुःख व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी पुढे असंही म्हणाले की,'अरुण जेटली यांचं निधन झालंय यावर विश्वास बसत नाहीय. यापूर्वी बहीण सुषमा स्वराज सोडून गेल्या आणि आता सोबत असणारा मित्रदेखील गेला.मी बहरीनमधून अरुण जेटली यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. या दु:खद प्रसंगात ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो ही प्रार्थना करतो'.

(वाचा : सततच्या धक्क्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन पलटवार' तयार, या 5 मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू)

पंतप्रधानांनी फोनवरून व्यक्त केला शोक

अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त मिळताच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आणि आपला शोक, संवेदना व्यक्त केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण जेटली यांचे पुत्र रोहन यांनी पंतप्रधान मोदींना त्यांचा परदेश दौरा रद्द न करण्याची विनंती फोनवरून केली. अरुण जेटलींचं निधन झाल्याचं समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहली.

(वाचा :औरंगाबादेत एकाच दिवशी तीन महिलांचे मंगळसूत्र लांबवले, चोरटे CCTV त कैद)

उपचारादरम्यान जेटलींनी घेतला अखेरचा श्वास

देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी (24 ऑगस्ट) निधन झालं. एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. जेटली यांनी आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती आणि शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(वाचा : सोलापुरात शरद पवारांच्या कन्येच्या ताफ्यावर कारवाई, पोलिसांनी दंडही आकारला)

डोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 10:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...