तालिबानी फतवा! कपड्यांची उंची मोजूनच विद्यार्थिनींना दिला जातो कॉलेज प्रवेश, VIDEO VIRAL

तालिबानी फतवा! कपड्यांची उंची मोजूनच विद्यार्थिनींना दिला जातो कॉलेज प्रवेश, VIDEO VIRAL

मुलींसाठी असलेल्या एका कॉलेजमधील ड्रेस कोडसंदर्भात तालिबानी फतवा जारी करण्यात आली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 16 सप्टेंबर : मुलींसाठी असलेल्या एका कॉलेजमधील ड्रेस कोडसंदर्भात तालिबानी फतवा जारी करण्यात आली आहे. सेंट फ्रान्सिस गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी नवीन ड्रेस कोडवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. नवीन नियमानुसार विद्यार्थिनींनी गुडघ्याच्या खाली असा लांब कुर्ता किंवा ड्रेस परिधान केल्यासच त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. इतकंच नाही तर विद्यार्थिनींच्या कुर्त्यांचं मोजमाप घेण्यासाठी एक महिला सुरक्षारक्षक देखील नेमली आहे. ही महिला कर्मचारी विद्यार्थिनींचं ओळखपत्र तपासून त्यांच्या कुर्त्यांची उंची मोजण्याचं काम करतेय. आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद येथील ही चीड आणणारी घटना आहे.

(वाचा : पुण्यात खासगी बस-कारचा अपघात, संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरसह दोघांचा जागीच मृत्यू)

सेंट फ्रान्सिस गर्ल्स कॉलेज प्रशासनानं हा तालिबानी फतवा 1 ऑगस्टपासून लागू केला आहे. ज्या विद्यार्थिनी या नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही. या नियमाचं विद्यार्थिनींनी कडाकडून विरोध दर्शवला आहे. याविरोधातील पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सुरक्षारक्षक विद्यार्थिनींच्या कुर्तींची उंची मोजत असल्याचं दिसत आहे. ठरवून देण्यात आलेल्या उंचीनुसार एखाद्या मुलीचा कुर्ता किंवा ड्रेस नसल्यास थेट कॉलेज प्रवेश नाकारला जातो.

(वाचा : 'मला HIV झालाय', दिग्गज खेळाडूला नाईलाजास्तव करावं लागलं जाहीर!)

...तर मुलींना चांगली स्थळं येतील   

या कॉलेजच्या एका माजी विद्यार्थिनीनं नव्या ड्रेस कोडसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थिनीनं सांगितलं की, कॉलेज प्रशासनाकडून मध्य सत्रात नवीन ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. लांब कुर्ते/ ड्रेस परिधान केल्यास लग्नासाठी चांगली स्थळं येतील, असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. याविरोधात आवाज उठवणं योग्य नाही, असंदेखील कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बजावलं.  'गुडघ्यांच्यावर किचिंतसाही कुर्ता/ड्रेस परिधान केल्यास आमचा छळ केला जातो.ज्या विद्यार्थिनी नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना कॉलेज बाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली जाते. यामुळे अभ्यासाचं नुकसान होतंय.', असा आरोपही तिनं केला आहे.

(वाचा :टीम इंडियाचा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये? सट्टेबाजांच्या संपर्कात असेलल्यांची चौकशी)

दरम्यान, या सर्व प्रकारावर अद्याप कॉलेज प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या