Elec-widget

अमित शहांकडून नवीन ओळखपत्राचा प्रस्ताव; आधार, पासपोर्ट सर्वकाही असेल एकाच कार्डमध्ये

अमित शहांकडून नवीन ओळखपत्राचा प्रस्ताव; आधार, पासपोर्ट सर्वकाही असेल एकाच कार्डमध्ये

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नागरिकांसाठी एका नवीन ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नागरिकांसाठी एका नवीन ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे. आधार कार्ड, पासपोर्ट, बँक खातं, वाहन चालक परवाना आणि मतदार ओळखपत्र यांसारख्या सर्व सुविधा एकाच कार्डमध्ये असणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी मांडलं. शिवाय, 2021मध्ये मोबाइल अॅपद्वारे जनगणना होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

(वाचा :राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यानंतर उदयनराजेंना मिळू शकते आनंदाची बातमी)

Loading...

याबाबत सांगताना गृहमंत्री म्हणाले की,'देशात एक अशी यंत्रणा देखील असावी, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास स्वयंचलित (ऑटोमेटिक)पद्धतीनं त्याची माहिती लोकसंख्येच्या डेटामध्ये अपडेट होईल. आम्हाला एक असं कार्ड आणायचं आहे, ज्याद्वारे आधार कार्ड, पासपोर्ट, बँक खातं, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र या सर्वांच्या आवश्यकता पूर्ण होतील'.

(वाचा :'दाऊदचे लोक भाजपमध्ये... हा खासदार जेजे हत्याकांडातील आरोपी')

आता अशी होणार जनगणना

अमित शहा यांनी सांगितलं की, जनगणना म्हणजे काही रटाळवाणं काम नाही. यामुळे सरकारला आपल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळते. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीतील अनेक मुद्दे सोडवण्यासाठीही सरकारला मदत होते. पण जनगणनेचं काम मोबाइल अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे.

(वाचा :...तर आम्ही बालाकोटच्या पुढे जाऊ; लष्कर प्रमुखांचा पकिस्तानला निर्वाणीचा इशारा)

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...