VIDEO : दुर्गा पूजा पंडालमध्ये अजान वाजल्यानं वाद, आयोजकांविरोधात तक्रार

VIDEO : दुर्गा पूजा पंडालमध्ये अजान वाजल्यानं वाद, आयोजकांविरोधात तक्रार

दुर्गा पूजा पंडालमध्ये कथित स्वरुपात अजानचं रेकॉर्डिंग वाजल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

  • Share this:

कोलकाता,7 ऑक्टोबर : कोलकातामध्ये आयोजित दुर्गा पूजा पंडालमध्ये कथित स्वरुपात अजानचं रेकॉर्डिंग वाजल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यामुळे दुर्गा पूजेचे आयोजक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका स्थानिक वकिलानं दुर्गा पूजेच्या आयोजकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वकील शांतनु सिंघा यांनी बेलीघाटा 33 पल्ली दुर्गा पूजा पंडालच्या आयोजकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. वकिलांनी 10 जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. यामध्ये पूजा पंडालच्या क्लब सेक्रेटरीच्या नावाचाही समावेश होता.

(वाचा :  Income Tax भरणाऱ्यांसाठी 'खुशखबर' नरेंद्र मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय)

आयोजकांचं काय आहे म्हणणं?

केवळ मानवतेचं दर्शन घडवण्यासाठी पूजेचं आयोजन करण्यात आल्याचं स्पष्टीकरण आयोजकांनी दिलं. तर दुसरीकडे, संबंधित व्हिडीओ विश्व हिंदू परिषदेकडून मिळाल्याचा दावा तक्रारकर्त्यानं केला आहे.

(वाचा :  कपड्यांवरून मुंबईच्या तरुणीला भररस्त्यात दिले संस्कृतीचे धडे,तिनं शिकवला असा धडा)

तक्रारकर्त्याचा गंभीर आरोप

दुर्गा पूजा पंडालमध्ये अजानचं रेकॉर्डिंग वाजवून पश्चिम बंगालमधील शांतता भंग केली जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारकर्त्यानं केला आहे. हा प्रकार मुद्दाम करण्यात आला असून यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, विनाकारण या मुद्याचं राजकारण केलं जात असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

(वाचा : अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहता येणार, 'या' मुस्लिम देशाचा निर्णय)

आयोजकांनी दिलं स्पष्टीकरण

यंदाच्या दुर्गा पूजेसाठी 'हम साथ हैं, अकेले नहीं' अशी थीम(देखाव्याचा विषय) ठेवल्याची माहिती आयोजकांनी दिली. केवळ मानवतेचं दर्शन घडवण्यासाठी याचे आयोजन करत आलं होतं.

कोलकात्यातल्या दुर्गा पूजेत बालाकोट हल्ल्याचा देखावा

Published by: Manoj Khandekar
First published: October 7, 2019, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading