धक्कादायक ! माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या, कारण...

धक्कादायक ! माजी विधानसभा अध्यक्षांनी केली आत्महत्या, कारण...

आंध्र प्रदेश विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 16 सप्टेंबर : आंध्र प्रदेश विधानसभा माजी अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं आहे. गळफास घेऊन राव यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना गंभीर परिस्थितीत हैदराबादमधील इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  कोडेला शिव प्रसाद राव हे तेलुगू देसम पार्टीचे नेते आहेत. आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पण गेल्याच बऱ्याच दिवसांपासून राव काही प्रकरणांशी झगडत होते. यामुळे ते नैराश्यातही होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचा :PM मोदींच्या उपस्थितीत उदयनराजेंच्या भाजपप्रवेश झाला नाही कारण...हे आहे कारण

राव यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार,  अलिकडील राजकीय घडामोडींमुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते.  वायएसआर काँग्रेस  सत्तेत आल्यानंतर शिवप्रसाद यांच्या मुलगा आणि मुलीवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटले दाखल करण्यात आले. यादरम्यानच, विधानसभेतील फर्निचरचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

(वाचा : कलम 370 वरून केंद्राला 'सर्वोच्च' दणका, काश्मीरची परिस्थिती सुधारण्यासाठी कोर्टाचे आदेश)

राव हे व्यवसायानं डॉक्टर होते. तसंच आंध्र प्रदेश विधानसभेचे ते पहिले अध्यक्ष होते.

(वाचा :VIDEO : संतापजनक! कपड्यांची उंची मोजूनच विद्यार्थिनींना दिला जातो कॉलेज प्रवेश)

बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या