धक्कादायक ! वडिलांची केली निर्घृण हत्या, 7 बादल्यांमध्ये ठेवले मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे

धक्कादायक ! वडिलांची केली निर्घृण हत्या, 7 बादल्यांमध्ये ठेवले मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे

मुलानं वडिलांची धारदार चाकून निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

हैदाराबाद, 19 ऑगस्ट : मुलानं वडिलांची धारदार चाकून निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. आरोपी मुलानं जवळपास सहा ते सात बादल्यांमध्ये वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे भरून ठेवले होते. कृष्ण सुधीर मूर्ती असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला त्याचे वडील दररोज मारहाण करत असत. त्यांच्या याच वागणुकीला कंटाळून मुलानं संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांना जीवे ठार मारलं. गंभीर गुन्हा केल्यानंतर मुलानं आपल्या वडिलांच्या मृतदेहाचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरले.

(वाचा : धक्कादायक! नोकरी जाण्याच्या नैराश्यात भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या)

कारण काही दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसात याची तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिसांनी घराची चौकशी केली त्यावेळेस त्यांना  बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यामध्ये मुलासोबत त्याची आई आणि बहिणाचाही सहभाग होता. हैदराबादच्या (Hyderabad) मलकाजगिरीमधील कृष्णानहर कॉलनीतील ही खळबळजनक घटना आहे.

अशी केली वडिलांची हत्या

गेल्या 80 वर्षांपासून कृष्ण सुधीर मूर्ती आपल्या कुटुंबीयांसोबत कृष्णानहर कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. सुधीर मूर्ती दररोज दारूच्या नशेत घरी येऊन मुलगा मुरली आणि मुलीला बेदम मारहाण करत असे.  मुलांना वाचवण्यासाठी त्यांची आई धावून गेल्यास तिलाही अमानुषरित्या मारझोड केली जायची. दररोज होणाऱ्या या मारहाणीला कंटाळून अखेर त्यांच्या मुलानं आई-बहिणीसह मिळून वडिलांचा काटा काढायचा कट रचला.

(वाचा :मद्यधुंद तरुणाच्या कारनं 7 जणांना उडवलं, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO)

रविवारीदेखील संध्याकाळी सुधीर मद्यधुंद अवस्थेत घरी आले. त्यावेळेस मुलगा मुरलीनं धारदार चाकून त्यांच्यावर सपासप वार केले. यानंतर त्यांच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून बादल्यांमध्ये भरले. योग्य वेळ आल्यास मृतदेहाचा बंदोबस्त करेन, असं मुरली ठरवलं. पण मृतदेह कुजल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आणि त्यांचं बिंग फुटलं.

याप्रकरणी पोलिसांनी मुरली, त्याची आई आणि बहिणीला ताब्यात घेतले आहे.

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 02:56 PM IST

ताज्या बातम्या