नथुराम गोडसे आणि पंतप्रधान मोदींचा विचार एकसमान, राहुल गांधींचं खळबळजनक विधान

नथुराम गोडसे आणि पंतप्रधान मोदींचा विचार एकसमान, राहुल गांधींचं खळबळजनक विधान

मात्र नथुराम गोंडसेंची विचारधारा मान्य असल्याचे मोदी कधीही स्वीकारू शकत नाही.

  • Share this:

कालपेट्टा, 30 जानेवारी :सध्या विविध मुद्द्यांवरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर खळवळजनक विधानं करीत आहेत. कॉंग्रेस नेता आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर शरसंधान केलं आहे. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशीच नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. देशभरात गांधींच्या पुण्यतिथिनिमित्ताने त्यांना विविध प्रकारे अभिवादन केले जात आहे. दिल्लीतील राजघाट येथे CAA विरोधात आंदोलन पुकारले आहे. यावेळी गांधींजींच्या नावावर CAA विरोधात आंदोलन केलं जात आहे. कॉंग्रेसच्या 'संविधान वाचवा' या मार्चदरम्यान एका रॅलीत राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, नथूराम गोडसे (Nathuram Godse) आणि नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. त्या दोघांमध्ये काही अंतर नाही. मात्र नथुराम गोंडसेंची विचारधारा मान्य असल्याचे मोदी कधीही स्वीकारू शकत नाही. आपण या गोष्टीकड़े लक्ष द्यायला हवे की जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींकड़े बेरोजगारी आणि नोकरीसंदर्भात विचारता तेव्हा ते तुमचं लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. NRC आणि CAA लागू केल्यामुळे नोकऱ्या मिळणार नाहीत.

काश्मिरमधील परिस्थिती बिघडवून आणि आसाममध्ये आगीची ठिणगी पेटवून आपल्या तरुणांना रोजगार मिळत नाही. ते पुढे जाऊन असंही म्हणाले की भारतीयांना स्वत:चे भारतीयत्व सिद्ध करण्यास सांगितले जात आहेत. हे ठरविणारे नरेंद्र मोदी कोण आहेत? य़ाचा परवाना त्यांना कोणी दिला? मला माहिती आहे की मी भारतीय आहे. आणि मला ते सिद्ध करण्याची गरज नाही.

First published: January 30, 2020, 2:01 PM IST

ताज्या बातम्या