चेन्नई, 13 मे : 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,' असं वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने दक्षिण भारतात खळबळ मोठी खळबळ माजली आहे.
चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केलं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचं नाव नथुराम गोडसे.'
अर्वाकुरची इथं येत्या रविवारी पोटनिवडणूक होणार आहे. तिथल्या प्रचारसभेत हमल हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येत असून काही लोकांच्या मते हसन यांनी केलेलं वक्तव्य बरोबरंच आहे, तर काहींनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, नथुराम गोडसे याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांचा खून केला आहे. त्यामुळे गोडसे याच्यावर सातत्याने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, असा आरोप करण्यात येतो. याआधी अनेकांनी हा आरोप केलेला आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. यात ते म्हणतात, 'माझ्या एका मित्राने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण अशा प्रश्न विचारला? त्यावर माझं उत्तर आहे गोडसे.'
विशाल भारद्वाज यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. भारद्वाज यांच्या या पोस्टमुळे काहींनी त्यांच्यावर टीकादेखील केली होती.
ममता की मोदी, कोण जिंकणार पश्चिम बंगाल? पाहा हा SPECIAL REPORT