इम्रान खान आधी आपलं घर सांभाळा, मग भारताबद्दल बोला - नसीरुद्दीन

'पाकिस्तानच्या घटनेत फक्त मुस्लिमच पाकिस्तानचा राष्ट्रपती होईल असं लिहिलं आहे. भारतात मात्र कुठल्याही जाती, धर्माचा व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकतो.'

News18 Lokmat | Updated On: Dec 23, 2018 10:13 PM IST

इम्रान खान आधी आपलं घर सांभाळा, मग भारताबद्दल बोला - नसीरुद्दीन

नवी दिल्ली, 23 डिसेंबर :  ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पकिस्तानातही उमटलेत. नसीरुद्दीन  यांच्या वक्तव्याचा हवालादेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर टीका केली होती भारतात अल्पसंख्याकांना योग्य वागणूक मिळत नाही. अल्पसंख्याकांना कसं वागवायचं हे आम्ही शिकवू अशी मुक्ताफळ त्यांनी उधळली होती. नसरुद्दीन शाह आणि MIM चे असादुद्दीन ओवेसी यांनी त्याला उत्तर दिलंय. इम्रान खान यांनी आधी आपलं घर सांभाळावं असं त्यांना सुनावण्यात आलंय.


नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या या विधानामुळं देशातल्या मोदी विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. मात्र भारतातल्या परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही मुक्ताफळ उधळली होती.


काय म्हणाले इम्रान खान?

Loading...


"भारतात अल्पसंख्याकांना समान वागणूक मिळणार नाही, हे जिना हयात असताना बोलत असत. भारतात अल्पसंख्यकांना योग्य आणि समान अधिकार मिळत आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी पाऊल उचलले जात आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचाही हाच विचार होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्यकांबरोबर कसे वागायचे हे शिकवू."


आपल्या वक्तव्यानं भारताच्या भूमिकेवर पाकिस्तानन टीका करताच नसीरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांना लागेच खडेबोल सुनावलेत.


काय म्हणाले नसीरूद्दीन शाह?


"मिस्टर इमरान खान, तुम्ही त्याच मुद्यावर भाष्य केले पाहिजे, जे तुमच्या देशाशी संबंधित आहे. ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही, त्यावर तुम्ही बोलू नये. मागील ७० वर्षांपासून आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे आमची काळजी कशी घ्यावी, हे आम्हाला समजते."


MIMचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवेसी यांनीही इम्रान खान यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले, पाकिस्तानच्या घटनेत फक्त मुस्लिमच पाकिस्तानचा राष्ट्रपती होईल असं लिहिलं आहे. भारतात मात्र कुठल्याही जाती, धर्माचा व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकतो आणि अनेक झालेही आहेत. तुम्हीच आमच्याकडून सर्वसमावेशक राजकारण आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांबाबत शिकलं पाहिजे असंही त्यांनी इम्रान खानला सुनावलं.
जगात फक्त भारतातच सर्व जाती धर्माचे लोक शांतते राहतात अशी प्रतिक्रीया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राजनाथ सिंग यांनी या वादावर बोलताना दिलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...