भारताच्या 'मिशन शक्ती'नंतर 'नासा'नं दिली ही प्रतिक्रिया

भारताच्या 'मिशन शक्ती'नंतर 'नासा'नं दिली ही प्रतिक्रिया

मिशन शक्तीवर आता नासानं देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 02 एप्रिल : 'मिशन शक्ती' यशस्वी झाल्यानंतर 'इस्त्रो'नं विज्ञान क्षेत्रात 'हम भी किसीसे कम नही' हा निरोप साऱ्या जगाला दिला. या मिशनमध्ये भारतानं अवघ्या 3 मिनिटांत क्षेपणास्त्राच्या मदतीनं पृथ्वीच्या सुमारे 300 किलोमीटर कक्षेत येणारा उपग्रह अचूकपणे नष्ट केला. दरम्यान, 'इस्त्रो'च्या 'मिशन शक्ती'नंतर 'नासा'नं मात्र अंतराळात कचरा झाला असून भविष्यात त्याचा त्रास होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या 'मिशन शक्ती' प्रमाणे अमेरिकेच्या 'नासा'कडे देखील जमिनीवरून अंतराळातील उपग्रह नष्ट तंत्रज्ञान आहे हे विशेष. 'मिशन शक्ती'मुळे अंतराळात 400 तुकडे झाल्याचं 'नासा'नं म्हटलं आहे. त्यामुळे अंतराळवीरांना मोठा त्रास पुढील काळात होईल असं 'नासा'चं म्हणणं आहे. 'नासा'चे प्रमुख जिम ब्रिडेनस्टाइन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी काय म्हणालं 'नासा'?

भारतानं राबवलेल्या 'मिशन शक्ती'मुळं अंतराळामध्ये 400 तुकडे निर्माण झाले आहेत. साधारण 10 सेंटीमीटरचे हे तुकडे आहेत. त्यापैकी 60 तुकडे शोधण्यात आले असून 24 तुकडे हे 'इंटर नॅशनल स्पेस स्टेशन'च्या वर गेल्याचं 'नासा'नं म्हटलं आहे. त्याचा परिणाम हा भविष्यात अंतराळामध्ये मानवाला पाठवताना होईल असं 'नासा'चं म्हणणं आहे. 'नासा' अंतराळामध्ये असलेल्या तुकड्यांवरती सतत लक्ष ठेवून असते. यामध्ये आत्तापर्यंत 23 हजार तुकडे अंतराळामध्ये आढऴून आले आहेत. पैकी 10 हजार तुकडे हे 'आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन'चे आहेत. या 10 हजारपैकी 3 हजार तुकडे चीननं 2007मध्ये केलेल्या 'एन्टी सॅटेलाईट टेस्ट'मुळे तयार झाले आहेत.

मिशन शक्ती नेमकं काय आहे?

भारताने 27 मार्चला ओडिसा येथील डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरून अँटी सॅटलाईट क्षेपणास्त्राची चाचणी केली. ही चाचणी DRDO साठी तांत्रिक आव्हान होतं. मात्र ते आव्हान यशस्वीपणे DRDOने पार पाडलं. चाचणी करताना महत्त्वाचं होतं ते म्हणजे क्षेपणास्त्र जमिनीवरून अंतराळातील उपग्रहावर मारा करणारं असल्यानं पृथ्वीच्या सुमारे 300 किलोमीटर कक्षेत येणारा उपग्रह अचूकपणे कमी वेळेत निकामी करणं. DRDO ने केलेल्या नियोजनानुसार ‘मिशन शक्ती’ अर्थात पृथ्वीच्या 300 किमी कक्षेत आलेला उपग्रह अवघ्या 3 मिनिटांत उद्ध्वस्त करून देशानं नवीन इतिहास रचला आहे.

VIDEO: परत त्याने त्रास दिला तर मी बघतोच त्याला; नांगरे पाटलांनी घडवली माय-लेकरांची भेट

First published: April 2, 2019, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading