मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता पाहता येणार 13 अब्ज वर्षांपूर्वीचं ब्रह्मांड; समोर आला ब्रह्मांडाचा 'डीप फील्ड' PHOTO

आता पाहता येणार 13 अब्ज वर्षांपूर्वीचं ब्रह्मांड; समोर आला ब्रह्मांडाचा 'डीप फील्ड' PHOTO

नुकतंच नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अमेरिकी अवकाश संशोधन संस्था, नासाच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात असं काही पाहिलंय जे मानवाने या पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं.

नुकतंच नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अमेरिकी अवकाश संशोधन संस्था, नासाच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात असं काही पाहिलंय जे मानवाने या पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं.

नुकतंच नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अमेरिकी अवकाश संशोधन संस्था, नासाच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात असं काही पाहिलंय जे मानवाने या पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं.

मुंबई, 12 जुलै: ब्रह्मांड हे असंख्य चमत्कारांनी भरलेलं आहे. ब्रह्मांडामधील रहस्यं जाणून घेण्यासाठी माणूस खूप उत्सुक आहे. त्यासाठी खगोलशास्त्रज्ञ मेहनत घेत असतात. नुकतंच नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अमेरिकी अवकाश संशोधन संस्था, नासाच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात असं काही पाहिलंय जे मानवाने या पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. त्यांनी ब्रह्मांडाचा एक अनोखा फोटो काढला आहे. NASA च्या नवीन स्पेस टेलिस्कोप जेम्स वेबने (James Webb Telescope) सुरुवातीच्या युनिव्हर्सचा आतापर्यंतचा सर्वांत खोल, स्पष्ट आणि विविधरंगी इन्फ्रारेड फोटो कॅप्चर केला आहे. हा फोटो 13 अब्ज वर्षांपूर्वीच्या ब्रह्मांडाचं दृश्य दाखवतो. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये हा फोटो रिलीज केला. हा ऐतिहासिक क्षण असल्याचं यावेळी बायडेन म्हणाले. या फोटोमध्ये असंख्य तारे आणि हजारो आकाशगंगा दिसत आहेत. खूप दूरच्या अंधुक गॅलेक्सीची झलकही त्यात दिसते. या फोटोत आपल्या सौरमालेबाहेरील एक महाकाय वायू ग्रह आणि नेबुलाचे दोन फोटोही आहेत. नेबुला असं ठिकाण आहे जिथे तारे जन्मतात आणि मरतात. याशिवाय या फोटोत 5 आकाशगंगा एकमेकांभोवती दिसत आहेत. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. हा पहिला फोटो आहे ज्यामध्ये माणूस इतक्या दूर अंतरावरील आणि इतकं जुनं दृश्य पाहण्यात यशस्वी ठरला आहे. 13.8 अब्ज वर्षांपूर्वीच्या बिगबँगनंतर बाहेर पडलेल्या प्रकाशाचे काही भाग या टेलिस्कोपने टिपले असल्याचंही मानलं जातंय. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काढलेल्या या चित्राला "डीप फील्ड" असं नाव देण्यात आलं आहे. हा फोटो काढण्यासाठी टेलिस्कोपला 12.5 तास लागले. या नव्या फोटोमुळे ब्रह्मांडातील पहिल्या आणि अखेरच्या टोकांची माहिती मिळवण्यात गुंतलेल्या शास्त्रज्ञांना एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे, असं म्हटलं जातंय. हेही वाचा - आज चंद्राचा शनीशी प्रतियोग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा राशिभविष्य युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी यांच्या सहकार्याने नासाने ही कामगिरी केली आहे. आता लवकरच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा पहिला पूर्ण रंगीत फोटोही प्रसिद्ध होणार आहेत. हा फोटो आज मंगळवारी (12 जुलै 22) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. नासाची जेम्स वेब टेलिस्कोप ही जगातील सर्वांत मोठी आणि सर्वांत शक्तिशाली अंतराळ दुर्बीण आहे. ही दुर्बीण गेल्या वर्षी अमेरिकेतील फ्रेंच गयाना इथून लाँच करण्यात आली होती. या दुर्बीणचं वजन 6350 किलो असून तिला बनवण्यासाठी 900 कोटी डॉलरचा खर्च आला होता. जानेवारीमध्ये ही दुर्बीण पृथ्वीपासून 16 लाख किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. तिथे पोहोचल्यानंतर तिची उपकरणं सुरू करण्यात आली. या दुर्बीणमध्ये सोन्याचा मुलामा असलेला 21 फुटांचा फुलासारखा दिसणारा आरसा आहे. हा आतापर्यंत अंतराळात पाठवण्यात आलेला सर्वांत मोठा आणि संवेदनशील आरसा असून, यात 18 सेगमेंट आहेत. जेम्स वेबचे उपप्रकल्प शास्त्रज्ञ जोनाथन गार्डनर यांनी सांगितलं की, या दुर्बिणीच्या माध्यमातून अब्जावधी वर्षांमागचा काळ पाहण्यात आम्हाला यश आलंय. त्या आकाशगंगांमधून निघणारा प्रकाश आपल्या दुर्बिणीपर्यंत पोहोचण्यास अब्जावधी वर्षे लागली, त्यामुळे हे शक्य झालं. आता पुढील खगोलशास्त्रज्ञ या आकाशगंगा किती जुन्या आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. ब्रह्मांडातील अनोख्या गोष्टींची गुपितं उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसंच येत्या काळात आपल्याला सोलर सिस्टमबद्दलही नवीन माहिती मिळणार आहे.
First published:

Tags: Nasa

पुढील बातम्या