SPECIAL नरेंद्र मोदींनी ज्या महिलेच्या पाया पडल्या त्यांच्या समोर ब्रिटनलाही झुकावं लागलं

SPECIAL नरेंद्र मोदींनी ज्या महिलेच्या पाया पडल्या त्यांच्या समोर ब्रिटनलाही झुकावं लागलं

डॉ, अन्नपूर्णा शुक्ला यांच्या संशोधनाची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली होती.

  • Share this:

वाराणसी 29 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे चार अनुमोदक होते. त्यातल्या एक अनुमोदक होत्या डॉ. अन्नपूर्णा शुक्ला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी पंतप्रधानांनी डॉ. शुक्लांना चरणस्पर्श केला. त्या घटनेनंतर त्यांच्याविषयी देशभर उत्सुकता निर्माण झाली होती. या घटनेनंतर त्यांच्याविषयी आता बरीच महिती बाहेर येत आहे. त्यांच्याच संशोधनापुढे ब्रिटनलाही झुकावं लागलं आहे.

जगाने घेतली दखल

तुम्ही बेबी फुडचं कुठलंही प्रॉडक्ट घेतलं तर त्यावर एक वाक्य हमखास बघायला मिळतं. ते म्हणजे. कुठल्याही अन्ना पेक्षा लहान मुलांना आईचं दूध हे सर्वोत्तम अन्न आहे. त्यामुळे मुलांची रोग प्रतिकार क्षमता वाढते. डॉ. अन्नपूर्णा यांच्या संशोधनामुळे ब्रिटनच्या सर्वात मोठ्या बेबी फुड बनविणाऱ्या कंपनीने आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर हे वाक्य छापायला सुरुवात केली. लहान मुलांसाठी जे दूध पावडर तयार केलं जातं त्या डब्यांवर हे वाक्य हमखास लिहिलं जातं.

आईचं दूध सर्वोत्तम

1969 ते 1972 या काळात डॉ. शुक्ला यांनी संशोधन करून हे सिद्ध केलं की लहान बाळांसाठी आईचं दूध हे सर्वोत्तम असतं. त्यांचं हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याची दखल घेतली. एवढच नाही तर जन्मानंतर सहा महिने लहान बाळाला आईचं दूध पाजणं अत्यंत गरजेचं आहे अशी शिफारस WHOने केली होती.

WHOची मान्यता

डॉ. शुक्ला म्हणाल्या, ज्या मुलांना आईचं दूध मिळत नाही त्यांचं वजन कमी आढळून आलं तसच त्यांची प्रतिकार शक्तीही कमी असल्याचं आढळून आलं. या संशोधनानंतर काही बेबी फुड कंपन्यांनी आईच्या दुधाचं महत्त्व सांगणारी टीप दिली होती. मात्र काही कंपन्या अशी टीप छापायला तयार नव्हत्या. मात्र WHOने दखल घेत निर्देश दिल्यानंतर त्यांनी अशी टीप छापायला सुरुवात केली. त्यांच्या या संशोधनाची जगभर दखल घेतली गेलीय.

डॉ.शुक्ला या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या मानस कन्या समजल्या जातात. त्या बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसच अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचे पती बी.एन. शुक्ला हे गोरखपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसच रशियात भारताचे मुत्सद्दी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाया पडल्या तेव्हा तुम्ही काय आशीर्वाद दिला असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही आणखी नव नवी शिखरं पादाक्रांत करावीत असा आशीर्वाद मी त्यांना दिला.

First published: April 28, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading