S M L

आता भाषण फक्त 50 मिनिटांचंच, पंतप्रधानांची 'मन की बात'

'मन की बात'मधून 34व्या वेळा देशाशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला 50 मिनिटांहून जास्त लांबीचं भाषण देणार नसल्याची कबुली दिली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 30, 2017 02:51 PM IST

आता भाषण फक्त 50 मिनिटांचंच, पंतप्रधानांची 'मन की बात'

30जुलै: 'मन की बात'मधून 34व्या वेळा  देशाशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला 50 मिनिटांहून जास्त लांबीचं भाषण देणार नसल्याची कबुली दिली आहे. मागच्या वर्षी  15 ऑगस्टला  लांबलचक भाषण दिल्याची टीका पंतप्रधानांवर झाली होती. तसंच त्यांनी वर्ल्ड कप  फायनलमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीम हरल्यानंतरही सगळा देश त्यांच्यासोबत उभा राहिल्याची प्रशंसाही  केली.

पंतप्रधानांच्या 'मन की बात'मधील 6 महत्त्वाचे मुद्दे

-भाषणाची सुरूवात त्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्याने केली. पर्यावरणाच्या बदलावर त्यांनी भाष्य केलं. तसंच देशात ठिकठिकाणी आलेल्या पुरांबद्दलही चिंता व्यक्त करत सरकार सगळ्या पद्धतीची मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वत:हून पुढाकार घेऊन पुरग्रस्त लोकांची मदत करणाऱ्यांचं कौतुकही त्यांनी केलं.- पंतप्रधनांनी त्यांच्या भाषणात  जीएसटीचा मुद्दा मांडला. जीएसटीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाल्याचंही त्यांनी म्हटलं. अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत असंही ते म्हणाले. तसंच जीएसटी लागू केल्याबद्दल त्यांनी सर्व राज्यांचं अभिनंदनही केलं.

-पंतप्रधानांनी ऑगस्टला क्रांतीचा महिना म्हटलंय. या महिन्यात भारत स्वतंत्र झाला होता. यावर्षी देश 'भारत छोडो' अभियानाचं अमृतमहोत्सवी  वर्ष साजरं करतोय. भारत छोडो हा नारा देणाऱ्या डॉ. युसूफ मेहेर अलींचीही त्यांनी आठवण काढली.

- यावर्षी स्वतंत्र होऊन भारताला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी त्यांनी 15 ऑगस्टला संकल्प दिन म्हणून साजरा करण्याची मागणी केली. जातीयवाद आणि गरिबी संपवायचा संकल्प करायचीही त्यांनी मागणी केली.

Loading...
Loading...

-रक्षाबंधन, दिवाळी सारख्या उत्सवांमध्ये अनेकांना रोजगार मिळतो. या सणांना पर्यावरणाचं संरक्षण करावं असंही मोदींनी सांगितलं. तसंच सणांना गरिबांची मदत करण्याचा संकल्प करावा असंही त्यांनी सुचवलं.

-तसंच त्यांनी आपल्या भाषणात गणेशोत्सवाचाही उल्लेख केला आणि गणेशोत्सवात  गणपतीच्या मातीच्या मूर्तीचं पूजन करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचीही मागणी पंतप्रधानांनी केली.

एका रिपोर्टनुसार आकाशवाणीने पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमातून 10 कोटींची कमाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 02:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close