शपथविधीआधीच नरेंद्र मोदींच्या या मित्राचं सरकार कोसळलं

शपथविधीआधीच नरेंद्र मोदींच्या या मित्राचं सरकार कोसळलं

नरेंद्र मोदी यांनी 25 पेक्षा पक्षांना NDAत एकत्र आणलं मात्र मोदींचे खास मित्र नेतन्याहू यांना नवे मित्र जोडता आले नाहीत.

  • Share this:

जेरुसलेम 30 मे : इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी यांची खास मैत्री आहे. नेतन्याहू हे मोदींना ऐकेरी नावांनीच संबोधतात एवढी त्यांची मैत्री घट्ट आहे. नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताहेत. तर त्यांचा खास मित्र असलेल्या नेतन्याहू यांना मात्र आघाडी करता न आल्याने सरकार सोडावं लागतंय. आता इस्त्रायमध्ये पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासून त्यांची आणि नेतन्याहू यांची ही मैत्री आहे.

एप्रिल महिन्यात इस्त्रायलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकूड पक्षाला एकूण 120 जागांपैकी 35 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना आणखी काही जागांची गरज होती. इतर पक्षांशी आघाडी करून ते सकार स्थापन करू शकले असते. मात्र आघाडी करतानाच्या चर्चेत इतर पक्षांचं मन वळविण्यास त्यांना यश आलं नाही.

आघाडी करण्यासाठी बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना मुदत होती. मात्र आघाडी होत नसल्याने खासदारांनी संसद भंग करण्याची मागणी केली. त्यामुळे संसद भंग करण्याची शिफारस नेतन्याहू यांनी केली. आता सप्टेंबर महिन्यात इस्त्रायलमध्ये पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत.

कट्टर विचारांच्या यहुदी शिक्षणसंस्थांमधल्या विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण सक्तिचं करावं की नको या विषयावर इस्त्रायलमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अती उजव्या विचारांच्या पक्षांची या विद्यार्थ्यांना सुट द्यावी अशी भूमिका आहे. त्यामुळे याविषयावर वाद सुरू आहे. नेतन्याहू यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली असती तर ते पाचव्यांदा इस्त्रायलचे पंतप्रधान झाले असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...