03 सप्टेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात वापरलेलं धक्कातंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खातेवाटपातही वापरलं. संरक्षणमंत्रीपद निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आलंय. इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
सुरेश प्रभू यांच्याकडचं रेल्वे मंत्रिपद आता पियुष गोयल यांच्याकडे गेलंय. तर सुरेश प्रभू यांच्याजवळ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देण्यात आलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम खात्याचं कॅबिनेटमंत्रीपद देण्यात आलंय.
नितीन गडकरी यांच्याकडे अगोदरच्या खात्यांसह नितीन गडकरींकडे जलसंपदा, नदीविकास आणि गंगा स्वच्छता ही खाती देण्यात आलीयेत. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम खात्याचं कॅबिनेटमंत्रीपद देण्यात आलंय.
मोदी सरकारचा तिसरा खांदेपालट आहे. हा खांदेपालट म्हणजे 2019च्या निवडणुकीची तयारी म्हणता येईल.
कोण आहेत कॅबिनेट मंत्री?
निर्मला सीतारामन - संरक्षणमंत्री
नितीन गडकरी - दळणवळण, शिपिंग, जलसंपदा, नदीविकास, गंगा स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम मंत्री, कौशल्यविकास मंत्री
पियुष गोयल - रेल्वे, कोळसा मंत्री
मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याकमंत्री
उमा भारती - पेजयल, स्वच्छता मंत्री
सुरेश प्रभू- वाणिज्य आणि उद्योग मंत्री
कोण आहेत राज्यमंत्री?
शिवप्रसाद शुक्ल - अर्थ राज्यमंत्री
अश्विनी कुमार चौबे - आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री
डॉ. वीरेंद्र कुमार - महिला व बालविकास, अल्पसंख्याक राज्यमंत्री
अनंतकुमार हेगडे - कौशल्यविकास राज्यमंत्री
आर. के. सिंह - ऊर्जा मंत्रालय स्वतंत्र प्रभार
हरदीपसिंग पुरी - नगरविकास, गृहनिर्माण स्वतंत्र प्रभार
गजेंद्रसिंग शेखावत - कृषी राज्यमंत्री
सत्यपाल सिंह - मनुष्यबळविकास राज्यमंत्री
अल्फोन्स कन्नथानम - पर्यटन, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा