मराठी बातम्या /बातम्या /देश /आणीबाणीच्या काळात जाॅर्ज फर्नांडिस यांचे बाॅडीगार्ड होते मोदी

आणीबाणीच्या काळात जाॅर्ज फर्नांडिस यांचे बाॅडीगार्ड होते मोदी

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वयाच्या 88 वर्षी त्यांचं दिल्लीत निधन झालं. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सतत लढा दिला.

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वयाच्या 88 वर्षी त्यांचं दिल्लीत निधन झालं. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सतत लढा दिला.

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वयाच्या 88 वर्षी त्यांचं दिल्लीत निधन झालं. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सतत लढा दिला.

  नवी दिल्ली, 29 जानेवारी :  मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं. वयाच्या 88 वर्षी त्यांचं दिल्लीत निधन झालं. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सतत लढा दिला.

  इंदिरा गांधींनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली. या काळात देशातल्या अनेक मोठ्या नेत्यांची धरपकड सुरू होती. काही नेते तर भूमिगत व्हायचे. तुरुंगवासापासून वाचण्यासाठी अनेक नेते वेषांतरही करायचे.

  यांमध्ये नरेंद्र मोदीही होते. त्यावेळी मोदींना गुजरातमध्ये लोक संघर्ष समितीचे महासचिव  बनवलं होतं. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मदत करणं हे त्यांचं काम होतं.

  मोदींनी स्वत:च सांगितलंय की आणीबाणीच्या काळात ते वेश बदलून वावरायचे. त्यांनी त्यांचं नावही वेगळं ठेवलं होतं. त्याच काळात हिरवी लुंगी नेसून जाॅर्ज फर्नांडिस यांच्या बाॅडीगार्डचं त्यांनी काम केलं होतं. सुरक्षा रक्षक बनून आपण जाॅर्ज फर्नांडिस यांच्याकडून बरंच काही शिकलो, असंही मोदी म्हणाले. या काळात ते भारतीय मजदूर संघाचे संस्‍थापक दत्‍तोपंत थेगडी यांच्या सोबतही होते.

  जॉर्ज फर्नांडिस यांचा अल्पपरिचय

  - जन्म 3 जून 1930

  - मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन कुटंबीयांत जन्म

  - सहा भावंडांमध्ये सर्वात मोठे होते जॉर्ज

  - वयाच्या 19व्या वर्षी हॉटेल आणि वाहतुक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्यासाठी काम केले

  - 1949मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले

  - कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा मोठा प्रभाव

  - 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

  - ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश

  - स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे नेतृत्व

  - आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून तुरुंगवास भोगला

  - 1977मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत उद्योगमंत्री

  - जुलै 1979मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर

  प्रभावी भाषण

  - पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर विश्वास नाही म्हणून मंत्रिमंडळातून राजीनामा

  - 1984च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव

  - 1989 मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर

  - संयुक्त आघाडी सरकारमध्ये रेल्वेमंत्री

  - 1991मध्ये मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलातून विजयी

  - 1994मध्ये नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांसोबत समता पक्षाची स्थापना

  - 1996 च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाची भाजपबरोबर युती

  - 1999च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल नवा पक्ष

  - 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये संरक्षणमंत्री

  - 2001मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामुळे मार्च ते ऑक्टोबर मंत्रिमंडळाबाहेर

  - ऑक्टोबर 2001मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.

  VIDEO : जॉर्ज फर्नांडिस यांचं कार्य एखाद्या हिरोप्रमाणे -संजय राऊत

  First published:
  top videos

   Tags: Death, George fernandes, Narendra modi, NDA