इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहूंसोबत 11वर्षाचा मोशेही बोलणार 'नमस्ते इंडिया'

इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहूंसोबत 11वर्षाचा मोशेही बोलणार 'नमस्ते इंडिया'

इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहू यांच्यासोबत दिल्लीला मोशेचं आगमन झालं. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं दिल्ली स्वागत केलं.

  • Share this:

14 जानेवारी : इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहू यांचं चार दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर दिल्लीत आगमन झालंय. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या वेळी सगळ्यांचं लक्ष आहे ते 11 वर्षीय मोशेकडे. 26-11 च्या हल्ल्यात नरीमन हाऊसमधून बचावलेला मोशे पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहू यांच्यासोबत दिल्लीला मोशेचं आगमन झालं. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं दिल्ली स्वागत केलं.

26/11/2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बेबी मोशेचे आई-वडील रिवेका आणि गव्रिएल होल्ट्झबर्ग यांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी मोशेची केअरटेकर असलेल्या सँड्रा सॅम्युएल यांनी मोशेला घेऊन खाली पळ काढला होता आणि दोघंही बचावले होते. त्यानंतर मोशे आणि सँड्रा इस्रायलला रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईल दौऱ्यावर गेले असताना त्यांनी तिथे मोशेची भेट घेतली होती.

First published: January 14, 2018, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading