गो रक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेवरून मोदी भडकले

गो रक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेवरून मोदी भडकले

'गाईसाठी आपण एकमेकांचा जीव घेणार का?', देशात गोहत्येवरून होणाऱ्या हिंसेवर अखेर आज पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिलीय.

  • Share this:

29 जून : 'गाईसाठी आपण एकमेकांचा जीव घेणार का?', देशात गोहत्येवरून होणाऱ्या हिंसेवर अखेर आज पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिलीय. गोरक्षा करण्यासाठी आता आपण एकमेकांचा जीव घेणार का? ही कधीपासून आपली संस्कृती बनली?  हा देश महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसेचा देश आहे.विनोबा भावेंचा आहे.इथे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी खडसावलं.

साबरमती आश्रमातील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. पण विरोधाभास असा की गोरक्षणावरून हिंसेच्या बहुतांश घटना या भाजपशासित राज्यांमध्ये घडतायेत..उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, हरियाणा आणि झारखंड. त्यामुळे आता तिथले मुख्यमंत्री याबाबत खरंच हल्लेखोरांवर कारवाई करणार का, आणि पुढे गो रक्षणाच्या नावाखाली अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 02:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading