अरुण जेटलींचं मन वळवण्यासाठी नरेंद्र मोदींची धावाधाव

प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद नको, अशा आशयाचं पत्र नरेंद्र मोदी यांना लिहिलं. पण अद्याप मोदींनी जेटलींची ही मागणी पूर्ण केली आहे की नाही? याबाबत ठोस माहिती समजू शकलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 10:21 PM IST

अरुण जेटलींचं मन वळवण्यासाठी नरेंद्र मोदींची धावाधाव

नवी दिल्ली, 29 मे : प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद नको, अशा आशयाचं पत्र नरेंद्र मोदी यांना लिहिलं. पण अद्याप मोदींनी जेटलींची ही मागणी पूर्ण केली आहे की नाही? याबाबत ठोस माहिती समजू शकलेली नाही. जेटलींचं मन वळवण्यासाठी नरेंद्र मोदी बुधवारी (29 मे) त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याच्या निर्णयावर जेटलींनी पुनर्विचार करावा, यांसदर्भात मोदींनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, या भेटीदरम्यान मोदींनी त्याच्या प्रकृतीची देखील विचापूस केली. सोबत केंद्र सरकारसंदर्भातही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं बैठक झाली. या बैठकीत मोदींचे जेटलींचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

(पाहा : VIDEO: धक्कादायक! पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या)

दरम्यान,  30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याच दिवशी त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना देखील पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी जेटलींचं मन वळवण्यासाठी गेले होते, असं म्हटलं जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(वाचा : 'मला मंत्रिपद नको', अरूण जेटलींचं मोदींना पत्र)

मला मंत्रिपद नको, असं म्हणत भाजप नेते अरूण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अरूण जेटली यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांनी नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिलं आहे.

'तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. यावेळी मला खूप काही शिकता आलं. आताही तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाने पुन्हा एकदा बहुमत मिळवलं आहे. पण प्रकृतीच्या कारणास्तव मी नव्या सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही,' असं अरूण जेटली यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

(पाहा : VIDEO: वर्दीतील गायकाची शेतकऱ्यासाठी वरुणराजाला साद)(पाहा:VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. तर, NDAचं संख्याबळ हे 350च्या घरात गेलं. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार? मित्र पक्षांना किती जागा असणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषता जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 2014मध्ये अवघं एक मंत्रिपद मिळालं होतं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक पद शिवसेनेला देण्यात येणार होतं. पण, मातोश्रीवरून गेलेल्या फोननंतर अनिल देसाई यांना विमानतळावरून माघारी परतावं लागलं होतं.

शिवसेनेनं वेळोवेळी आपली नाराजी उघड केली होती. राज्यात देखील दोन्ही पक्षांमध्ये सतत खटके उडत होते. पण, भाजपनं बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत शिवसेनेशी जुळवून घेतलं. पण, NDA-2मध्ये शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार हे पाहावं लागणार आहे.

VIDEO : चंद्रपूर नव्हे सूर्यपूर! कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...