Home /News /national /

ज्या रेल्वे स्टेशनवर कधी चहा विकायचे नरेंद्र मोदी; आज पालटलं त्याचं रुपडं

ज्या रेल्वे स्टेशनवर कधी चहा विकायचे नरेंद्र मोदी; आज पालटलं त्याचं रुपडं

या संपूर्ण स्टेशनचं नुतनीकरण करण्यासाठी तब्बल 8.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

    गांधीनगर, 16 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवार गांधीनगर रेल्वे स्‍टेशन (Gandhinagar Railway Station) सह वडनगर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं. वडनगर रेलवे स्‍टेशन मोदींसाठी विशेष महत्त्वाचं आहे. कारण या स्टेशनवर ते लहानपणी वडिलांसोबत चहा विकायचे. त्यांचा टी स्टॉल आजही तेथे आहे. मात्र ते बदलून तेथे पर्यटन केंद्र करण्यात आलं आहे. या संपूर्ण स्टेशनचं नुतनीकरण करण्यासाठी तब्बल 8.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मंडळ रेल्वे प्रबंधन दीपक कुमार झा यांनी सांगितलं की, वडनगर शहर हेरिटेज सर्किटमध्ये येतं. यामुळे रेल्वे स्टेशनमध्ये बदल करताना याची अधिक काळजी घेतली गेली आहे. स्टेशनच्या इमारतीला 8.5 कोटी रुपयांचा खर्च करून हेरिटेड लुक देण्यात आला आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात वडनगर कस्बामध्ये पीएम मोदींचं घर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेशनसह अन्य प्रकल्पाचंही उद्घाटन केलं आहे. यामध्ये गांधीनगर रेल्वे स्टेशनच्या वरील विशेष फाइव्ह स्टार हॉटेलदेखील आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं फाइव्हस्टार हॉटेल तयार करण्यात आलं आहे. कसं असेल हॉटेल? मिळालेल्या माहितीनुसार, 318 खोल्यांच्या या लग्जरी हॉलेज खासगींमार्फत चालविण्यात येईव. हे 4700 स्क्वेअर मीटरपर्यंतच्या हॉटेलसाठी 790 कोटींची खर्च करण्यात आला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या