नरेंद्र मोदींचे काका ओळख लपवून घेत होते रूग्णालयात उपचार

नरेंद्र मोदींचे काका आपल्या रूग्णालयात उपचार घेत असल्याचं कळल्यानंतर डॉक्टरांची धावपळ उडाली.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 04:52 PM IST

नरेंद्र मोदींचे काका ओळख लपवून घेत होते रूग्णालयात उपचार

सुरत, 09 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काका ओळख लपवून सुरतमधील एका रूग्णालयात उपचार घेत होते. आता तुम्हाला त्यांनी ओळख का लपवली? असा प्रश्न पडला असेल नाही का? त्याला कारण देखील तसंच आहे. बुधवारी युरीन इन्फेक्शन झाल्यामुळं कांतीलाल रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आपली ओळख लपवली. यावेळी त्यांनी कांतीलाल मोदी हे आपलं नाव बदललं. नाव बदलन्याचा उद्देश देखील तितकाच शुद्ध होता. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काका आहोत हे कळल्यानं त्यांना मिळणारी वेगळी ट्रिटमेंट नको होती. शिवाय, इतर लोकांच्या उपचारावर त्याचा परिणाम झाला असता म्हणून त्यांनी आपण नरेंद्र मोदींचे काका असल्याचं लपवून ठेवलं. हिंदी वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पण, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना नरेंद्र मोदींचे काका रूग्णालयात उपचार घेत असल्याचे कळलं. त्यानंतर सिनिअर्स डॉक्टरांनी त्यांची विचारपूस केली.


मोदींचा दावा खरा की खोटा? राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावर माजी अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

त्यानंतर झाली धावपळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काका आपल्या रूग्णालयात उपचार घेत आहेत ही बाब समोर आल्यानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. युरीनच्या समस्येमुळं कांतीलाल मोदी रूग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांची शुगर लेव्हल 223 तर, ब्लड प्रेशर हे 150 होतं.

Loading...


‘राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचं ‘ते’ विधान चुकीचं’; भाजप नेत्याचा घरचा अहेर

कुटुंब जगतंय साधं आयुष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ आणि परिवारातील अन्य सदस्य सामान्य जीवन जगत आहेत. त्यांचे 81 वर्षाचे काका कांतीलाल मोदी यांनी देखील उपचारादरम्यान नरेंद्र मोदींचे काका आहोत असं सांगणं टाळलं.

कांतीलाल हे नरेंद्र मोदींचे काका असल्याचं कुणालाही सांगत नाहीत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांची आणि मोदींची भेट होत असे. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोघांची भेट झालेली नाही.


दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...