बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींनी 'अशी' वाहिली आदरांजली

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींनी 'अशी' वाहिली आदरांजली

'धाडसी बाळासाहेबांचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठीचा बाळासाहेबांचा निर्धार पक्का होता.'

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांचे अनेक चाहते त्यांचं स्मरण करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जयंतीनिमित्त बाळासाहेब यांना आदरांजली अर्पण केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचं स्मरण करत एक ट्वीट केलं आहे. 'धाडसी बाळासाहेबांचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठीचा बाळासाहेबांचा निर्धार पक्का होता. त्यांना प्रखर बुद्धिमत्ता लाभली होती. तसंच त्यांच्या वक्तृत्वाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केलं,' असं ट्वीट करत नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, जयंतीच्या निमित्ताने महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचं गणेश पूजन होणार आहे. या स्मारकाला राज्य सरकारने 100 कोटींची निधी जाहीर केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर स्मारकाची घोषणा झाली. पण त्यानंतर 5-6 वर्ष काहीच काम झाले नाही. आता शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात आणि भूमिगत स्वरूपात हे स्मारक केले जाणार आहे.

न्यूज18 लोकमत Exclusive : नारायण राणेंची अनकट मुलाखत

First published: January 23, 2019, 8:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading