पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर बोफर्स प्रकरणाचा हवाला भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शिवाय, राजीव गांधी यांचा कार्यकाळ भ्रष्टचारी नंबर 1 म्हणून संपल्याचं विधान देखील केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे.

राजीव गांधींनी इंदिराजींच्या हत्येदिवशीच घेतली होती पंतप्रधानपदाची शपथ!

कशी झाली होती राजीव गांधी यांची हत्या

राजीव गांधी यांच्या हत्येचा दिवस हा दहशतवादविरोधी दिवस म्हणून देखील पाळला जातो. 21 मे 1991 रोजी 10व्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राजीव गांधी हे तामिळनाडूत गेले होते. चेन्नईच्या पश्चिमेस असलेल्या श्रीपेरुंबदुर येथील सभेत राजीव गांधी भाषण करणार होते. त्यावेळी जमलेली गर्दी राजीव गाधींच्या गळ्यात हार घालून त्यांचे स्वागत करत होती. यावेळी राजीव गांधी एसपीजीची सुरक्षा तोडून थेट लोकांमध्ये गेले. याच संधीचा फायदा घेत एलटीटीई या दहशतवादी संघटनेकडून मानवी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या बॉम्बस्फोटात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह 25 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

भाजपला मत दिलं म्हणून पत्नीची फावड्यानं हत्या

राजीव गांधी यांचा राजकीय प्रवास

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा मोठा मुलगा राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. राजीव गांधी यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. राजीव यांचे सुरूवातीचे शिक्षण देहरादूनच्या प्रसिद्ध दून शाळेत झले. राजीव यांनी 1965 मध्ये ब्रिटनच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या इम्पेरियल कॉलेजमधून इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सोनिया यांच्याशी झाली. दोघांनी 1968 मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले. भारतात परतल्यानंतर राजीव यांनी कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवले. 1968 मध्ये पायलट म्हणून ते नोकरी करत होते. छोटा भाऊ संजय गांधी यांचा 23 जून 1980 रोजी एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. संजय यांच्या मृत्यूनंतर राजीव यांनी आई इंदिरा गांधी यांच्या मदतीसाठी राजकारणात पाऊल ठेवले. 1981मध्ये राजीव गांधी अमेठी लोकसभा मतगारसंघातून जिंकून आले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्याच दिवशी 40 वर्षीय राजीव यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर काँग्रेसने 508 मतांपैकी रेकॉर्ड ब्रेक 401 बिनशर्त मतं मिळवली. बोफर्स घोटाळ्यामध्ये देखील राजीव गांधी यांचं नाव आलं. 21 मे 1991 रोजी आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

घाटकोपरमध्ये भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

First published: May 21, 2019, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading