मुहूर्त ठरला ! नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा होणार 'या' दिवशी

मुहूर्त ठरला ! नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा होणार 'या' दिवशी

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांचाही याच दिवशी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. राष्ट्रपतींच्या ट्विटरवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींची NDAच्या नेतेपदी एकमतानं निवड

शनिवारी (25 मे) एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली. राजधानी नवी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय, 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देखील नरेंद्र मोदींच्या नावाला आपलं समर्थन दर्शवलं. शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपी अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासहीत एनडीएच्या घटक पक्षांनी आपलं समर्थनं दिलं. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वांचे आभार मानले आणि नरेंद्र मोदींना शुभेच्छा देखील दिल्या.

मोदींचा राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा

एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. शनिवारी (25 मे) रात्री जवळपास 8.30 वाजण्याच्या सुमारास मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे समर्थन पत्र सोपवल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळेस राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आणि त्यांना शपथविधीची तारीख, वेळ आणि मंत्र्यांची यादी कळवण्याची सूचनादेखील केली होती. त्यानुसार 30 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सरकार जलद गतीनं काम करणार - मोदी

राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला होता. 'आमचं सरकार जलद गतीनं काम करणार. जनाधारासहीत जनतेच्या अपेक्षादेखील जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आमचं सरकार नवीन स्वरूपात काम करेल', असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. त

NDAचा सत्तास्थापनेचा दावा

NDAनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. शनिवारी (25 मे) रात्री जवळपास 8.30 वाजण्याच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सरकार स्थापनेचं समर्थन पत्र सोपवलं.  अमित शहा यांच्यासोबत शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल, राजनाथ सिंह, नितीश कुमार, रामविलास पासवान, सुषमा स्वराज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, के पलानीस्वामी, कोनार्ड संगमा हेदेखील उपस्थित होते.

VIDEO : स्मृती इराणींना अश्रू अनावर, कार्यकर्त्याच्या पार्थिवाला दिला खांदा

First published: May 26, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या