पाटणा, 3 मार्च : 'एअर स्ट्राईकबाबत देशातील काही नेत्यांमुळे पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जात आहेत', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानातील सभेत त्यांनी सरकारच्या अनेक कामांबद्दल माहिती देत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
गांधी मैदानातील या सभेत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शैली वापरत जनतेला साद घातली. नरेंद्र मोदी म्हणाले की, 'विरोधक म्हणतात मोदींना हटवा. पण मी म्हणतो दहशतवाद हटवा. ते म्हणतात एकत्र येऊन मोदींना घालवा, पण मी म्हणतो चला एकत्र येवून भ्रष्टाचार मिटवू.'
'विरोधक म्हणतात...इंदिरा हटाओ, मी म्हणते गरिबी हटाओ,' असं इंदिरा गांधी आपल्या भाषणात म्हणत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता विरोधकांवर निशाणा साधताना नरेंद्र मोदींनीही इंदिरा गांधींची हीच स्टाईल वापरल्याचं पाहायला मिळालं.
PM Narendra Modi in Patna: These days a competition is underway to abuse the 'Chowkidaar', but you be assured, this 'Chowkidaar' of yours is as alert as ever. pic.twitter.com/uK1iNR0nuw
— ANI (@ANI) March 3, 2019
दरम्यान, बिहारमधील सभेत मोदींनी विरोधकांच्या अनेक टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आपका चौकीदार पुरी तरह से चौकन्ना हैं ,' असा विश्वास देत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा एनडीएला ताकद देण्याची साद जनतेला घातली. या सभेला मोदींसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजीपीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह एनडीएचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते.
VIDEO : 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?'