'देशानं एका कुटुंबामुळे मोठी किंमत चुकवली आहे', मोदींचा काँग्रेसवर 'ब्लॉग'हल्ला

'देशानं एका कुटुंबामुळे मोठी किंमत चुकवली आहे', मोदींचा काँग्रेसवर 'ब्लॉग'हल्ला

निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या काही दिवसांपासून मोदी विरूद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : यंदाची लोकसभा निवडणुकीची लढाई केवळ जाहीर सभांच्या माध्यमातूनच नाही तर डिजिटल प्लेटफॉर्मद्वारेही लढली जात आहे. सोशल मीडियावरदेखील सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (20 मार्च) सकाळी ब्लॉगच्या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. घराणेशाही, लोकशाही, संसदेसहीत त्यांनी कित्येक मुद्यांवरून काँग्रेसला टार्गेट केलं. तसंच भाजप सरकारच्या काळात कित्येक विकासकामं झाली, जी काँग्रेस सत्तेत असताना झाली नाहीत, याची आठवणही त्यांनी ब्लॉगद्वारे करून दिली आहे.

2014चा ऐतिहासिक जनादेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असंही लिहिलंय की, 'केवळ एका घराण्याच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कोणत्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकते, हे त्यांनी आणीबाणी लादून सिद्ध केलं आहे. 2014 मध्ये देशाची जनता अत्यंत दुःखी होती. सकारात्मक बातम्यांऐवजी केवळ भ्रष्टाचार, जवळच्या व्यक्तींना चुकीच्या पद्धतीनं फायदा करून देणं आणि घराणेशाहीच्याच हेडलाईन्स पाहायला मिळत होत्या. तेव्हा जनतेनं निवडणुकांच्या माध्यमातून भ्रष्टाचारात बुडालेल्या त्या सरकारपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी मतदान केलं, 2014चा हा जनादेश ऐतिहासिक होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घराणेशाहीची पार्श्वभूमी नसलेल्या पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं.

जेव्हा एखादे सरकार 'Family First'ऐवजी 'India First' या भावनेनं चालते, तेव्हा ही भावना त्यांच्या कार्यातही दिसून येते. आमच्या सरकारची धोरणं आणि कामकाजाच्याच प्रभावामुळे गेल्या पाच वर्षात भारत जगभरातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी झाला आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये संसदेचं कामकाज, प्रसिद्धी माध्यमांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधान-न्यायालय आणि सरकारी संस्था या मुद्यांवरूनही काँग्रेसला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत घराणेशाहीची परंपरा नसलेलं सरकार होतं त्यामुळे कामकाज व्यवस्थित पार पडलं, तर दुसरीकडे राज्यसभेत कामकाज होऊ शकले नाही कारण तेथे सदैव गोंधळ सुरू असायचा.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर 'मैं भी चौकीदार' अशी मोहीम सुरू केली. या मोहिमेनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

वाचा :'PM मोदी, जनतेला मूर्ख समजू नका', प्रियांका गांधींचा हल्लाबोल

प्रियांका गांधींचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या काही दिवसांपासून मोदी विरूद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉग लिहित गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. मोदींच्या ब्लॉगला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, ''जितका आम्हाला त्रास दिला जाईल. आम्ही तितक्याच जोमानं तुमच्याविरोधात लढू. आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला मूर्ख समजू नये. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत संस्थांवर हल्ला केला आहे.''

VIDEO : नागपुरात 20 बसची तोडफोड, पुण्यात 3 शिवशाही बस जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading