'जर पटेल हे पहिले पंतप्रधान असते तर...' मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

'जर पटेल हे पहिले पंतप्रधान असते तर...' मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

आपल्या भाषणात मोदींनी या सरकारने अनेक विकास कामे केल्याचा दावा केला आहे. दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत नरेंद्र मोदी बोलत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाची स्थिती आज वेगळी असती,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच आपल्या भाषणात मोदींनी या सरकारने अनेक विकास कामे केल्याचा दावा केला आहे. दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत नरेंद्र मोदी बोलत आहेत.

मोदींच्या भाषणातील मोठे मुद्दे:

-देशाच्या ऐक्यासाठी काम करणं हे प्रत्येकाचं ध्येय

-भाजपचं सरकार केवळ विकासाच्या मार्गावर चालत आहे

-भ्रष्टाचार न करता़ही सरकार चालवता येतं हे भजप सरकारनं दाखवून दिलं

-करदात्यांचया प्रत्येक पैशाचा विनियोग उचित प्रकारे होतो याचा करदात्यांना विश्वास

-2014 नंतर देशाला अंधारातून बाहेर काढण्याचं काम भाजप सरकारनं केलं

-काँग्रेसनं देशाला अंधाराच्या खाईत लोटलं होतं

-या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागलेला नाही

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद दोन दिवसांपासून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेते या राष्ट्रीय परिषदेला हजर होते. या परिषदेची आज सांगता होत आहे.

राष्ट्रीय परिषदेत काय म्हणाले अमित शहा?

जपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. '2019 च्या निवडणुका भारताच्या विकासाच्या मुद्द्यावर आहेत. पराक्रमाची पराकाष्ठा करत मोदींना पुन्हा एकदा जिंकून द्या', असं आवाहनच शहा यांनी केलं आहे. तसंच 'काश्मिरपासून ते केरळपर्यंत पूर्णपणे भाजपचं सरकार येईल', असा दावाही त्यांनी केली.

नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत 'अब की बार फिर मोदी सरकार' असा नारा देण्यात आला आहे. यावेळी भाषणात अमित शहा यांनी काँग्रेस, महाआघाडीवर टीका केली.

अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे

- देशातील 12 कोटी घरांमध्ये टॉयलेट नव्हते. त्यातल्या 9 कोटी घरांमध्ये पाच वर्षं व्हायच्या आधी टॉयलेट्स बांधले

- 2014 साली चार कोटी लोक अर्थतंत्राशी जोडले नव्हते मात्र दोन वर्षांच्या काळात 6 कोटी लोकांचे बँक अकाऊंट्स उघडले गेले

- एकेकाळी काँग्रेस विरूद्ध संगळे असं होतं आता भाजप विरूद्ध सगळे आहे

- ज्याप्रकारे उत्तरप्रदेशात 325 जागा जिंकत भाजपनं प्रचंड यश मिळवलं.. आता तिथे आत्या-भाचा एकत्र येतायत. जे कधी एकमेकांना पाण्यात पाहात होते, ते आता हात मिळवत आहे. कारण, त्यांना माहिती आहे की, मोदींना एकट्यानं हरवणं शक्य नाही

- संपूर्ण जगात मोदींसारखा लोकप्रिय नेता नाहीये जो लोकांना धरून ठेवेल.. युती म्हणजे काय असतं.. युती म्हणजे केवळ त्या त्या राज्यातील पक्षाचं कडबोळं असतं

- 2014 मध्ये केवळ 6 राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं. 2019 च्या निवडणुकांच्या वेळी देशात 16 राज्यांत भाजपचं सरकार आहे.

BREAKING : 'या' एका जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद

First published: January 12, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading