मराठी बातम्या /बातम्या /देश /

"जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

"जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

weapons are not thrown while the battle is on said PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं आहे. यासोबतच सर्व नागरिकांना सल्लाही दिला आहे.

weapons are not thrown while the battle is on said PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं आहे. यासोबतच सर्व नागरिकांना सल्लाही दिला आहे.

weapons are not thrown while the battle is on said PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं आहे. यासोबतच सर्व नागरिकांना सल्लाही दिला आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी कोरोना लसीकरणाचा (Vaccination) 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याचं कौतुक करत ही एक ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं आहेत. हा केवळ आकडा नाही तर नव्या भारताचं चित्र आहे. जनतेच्या सहकार्यामुळेच 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झालं आहे, मी संपूर्ण भारताचं मन:पूर्वक अभिनंदन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका

कोरोनाविरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे. कितीची चांगले आणि उत्तम कवच असले किंवा सुरक्षेची पूर्ण हमी असली तरी जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका. मी विनंती करतो की आपण आपले सण, उत्सव अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे, निष्काळीपणा नको असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लसीकरणात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत कोरोनापासून सुरक्षित आहे हे आपण जगाला दाखवून दिलं आहे. लसीकरणावरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण जगाला दिलंय. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' यशस्वी करुन दाखवलंय. कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं आहे. लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. थाळी वाजवून, दिवे प्रज्वलित करुन भारताने एकतेचं दर्शन घडवलं.

अतिशय वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली. लसीकरण मोहीम राबवताना भारताने विज्ञानाची कास सोडली नाही. को-विन अॅपच जगभरातून कौतुक सुरू आहे. भारतातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत उत्साहाचं वातावरण आहे. गतीशक्ती योजना भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देणार आहे. सणवार तोंडावर आहेत, अर्थव्यवस्थेत सकारात्मक चित्र दिसेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

स्वच्छ भारतप्रमाणेच स्वदेशी वस्तूंसाठी चळवळ उभारली पाहिजे

'मेड इन इंडिया'ची ताकद काय आहे याचादेशाला अनुभव येत आहे

जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत हत्यार खाली ठेवू नका, मोदींचा सल्ला

सणवार तोंडावर आहेत, अर्थव्यवस्थेत सकारात्मक चित्र दिसेल

गतीशक्ती योजना भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देणार

लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत उत्साहाचं वातावरण आहे

भारतातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे

को-विन अॅपच जगभरातून कौतुक सुरू आहे

लसीकरण मोहीम राबवताना भारताने विज्ञानाची कास सोडली नाही

अतिशय वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली

थाळी वाजवून, दिवे प्रज्वलित करुन भारताने एकतेचं दर्शन घडवलं

लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही

कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं आहे

'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' यशस्वी करुन दाखवलंय

लसीकरणावरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण जगाला दिलंय

भारत कोरोनापासून सुरक्षित आहे हे आपण जगाला दाखवून दिलं आहे

ज्या वेगाने 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला त्यामुळे जगभरात भारताचं कौतुक

नवीन भारताचं संपूर्ण जगाला दर्शन घडलंय

मी संपूर्ण भारताचं मन:पूर्वक अभिनंदन करतो

130 कोटी जनतेच्या सहकार्यामुळेच 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा आपण ओलांडला आहे

" isDesktop="true" id="621443" >

कोरोना काळात 9 वेळा संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात एकूण 9 वेळा देशवासियांना संबोधित केलं आहे.

पहिल्यांदा - 19 मार्च 2020

दुसऱ्यांदा - 24 मार्च 2020

तिसऱ्यांदा - 3 एप्रिल 2020

चौथ्यांदा - 14 एप्रिल 2020

पाचव्यांदा - 12 मे 2020

सहा - 30 जून 2020

सात - 20 ऑक्टोबर 2020

आठ - 20 एप्रिल 2021

नऊ - 7 जून 2021

First published:

Tags: Corona vaccination, Narendra modi