LIVE नरेंद्र मोदी : वाराणसीत मोठ्या शक्तिप्रदर्शनानंतर केली गंगाआरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारणसीतून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो केला. समर्थकांचा प्रचंड प्रतिसाद या रॅलीला मिळाला. त्यानंतर मोदींनी मंत्रोच्चारांच्या गजरात गंगेची आरतीही केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 08:37 PM IST

LIVE नरेंद्र मोदी : वाराणसीत मोठ्या शक्तिप्रदर्शनानंतर केली गंगाआरती

वाराणसी, 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारणसीतून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो केला. या रोड शो साठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली होती. मोदी उघड्या गाडीतून लोकांना अभिवान करत निघाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.

पंतप्रधानांबरोबर या रोड शो मध्ये भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सामील झाले. त्यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. या भव्य रोड शो नंतर दशाश्वमेध घाटावरून नरेंद्र मोदी गंगा आरतीमध्ये सामील झाले. मोदींनी स्वतः मंत्रोच्चारांच्या गजरात गंगेची आरती केली.


बनारसच्या प्रसिद्ध लंका गेटपासून दशाश्वमेध घाटापर्यंत हा रोड शो झाला. हा 5 किमी चा रस्ता मोदींच्या चाहत्यांनी भरून गेलेला होता. मोदी मोदी घोषणा देण्यात येत होत्या. रस्त्यात 20 ठिकाणी मोदींवर पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यासाठी 25 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या गेल्या. कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा उत्साह प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाराणसीमध्ये दिसला.


Loading...


या रोड शो नंतर शुक्रवारी नरेंद्र मोदी वारणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याअगोदर मोदींचं हे शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरलं. प्रियांका गांधी वाड्रा या मोदींविरोधात वाराणसीतून उभ्या राहतील अशी चर्चा होती. या चर्चेला गुरुवारी सकाळीच पूर्णविराम मिळाला. अचानक काँग्रेसने अजय राय यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरुद्ध राय तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.मोदींच्या विरुद्ध अजय राय एक तगडे उमेदवार मानले जात होते. आमदार म्हणून जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. पण मोदींच्या विरुद्ध त्यांची अनामत रक्कमच जप्त झाली. ते तिसऱ्या स्थानी राहिले तर अरविंद केजरीवाल दुसऱ्या नंबरवर होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...