भ्रष्टाचारी नंबर 1 : मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने दाखल केली तक्रार

भ्रष्टाचारी नंबर 1 : मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने दाखल केली तक्रार

राजीव गांधींबदद्ल मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मोदींसारख्या पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीने असं विधान करणं हा त्या पदाचाच अपमान आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या एका सभेत राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आणि राजीव गांधींवरही कडवी टीका केली.

राजीव गांधींचा कार्यकाळ मिस्टर क्लीन म्हणून सुरू झाला असला तरी त्यांचा अंत भ्रष्टाचारी नंबर 1 या रूपात झाला, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.

मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीने असं विधान करणं हा त्या पदाचाच अपमान आहे, असं काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

उद्या होणार सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. आता या खटल्यावर सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी घेणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिल्ली विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनीही आक्षेप घेतला आहे. मोदींनी राजीव गांधींचा अपमान करून खोटा आरोप केला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

'राजीव गांधींचा अपमान'

देशासाठी प्राणांचं बलिदान देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर अशा प्रकारे टीका करून मोदींनी पंतप्रधानपदाचा स्तर खाली आणला आहे, असंही प्राध्यापकांनी या जाहीर निवेदनात म्हटलं आहे.

या निवेदनात त्यांनी राजीव गांधींनी टेलिकम्युनिेकेशन क्षेत्रात क्रांती केल्याचा उल्लेख केला आहे. जेव्हा कारगिल युद्धात आपल्या जवानांनी शत्रूच्या सैन्यावर मात केली तेव्हा त्यांनी बोफोर्सच्या तोफा सैन्यात आणल्याबद्दल राजीव गांधींचे आभारच मानले होते हेही यात लिहिलं आहे.

या निवेदनात दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष नारायण मिश्रा यांच्यासह आणखी सदस्यांचा समावेश आहे.

================================================================================

VIDEO: कमीत कमी साधू संन्यासींना त्रास देणं सोडा- साध्वी प्रज्ञा

First published: May 7, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading