S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १५ ठळक मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतवासियांना उद्देशून जवळपास १ तास २४ मिनिटं भाषण केलं. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीचं त्यांचं हे लालकिल्ल्यावरचं शेवटचं भाषण होतं.

Updated On: Aug 15, 2018 10:56 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १५ ठळक मुद्दे

भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळपास १ तास २४ मिनिटं भाषण केलं. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीचं त्यांचं हे लालकिल्ल्यावरचं शेवटचं भाषण होतं. त्यामुळे साहजिकच प्रत्येक भारतीयाचं या भाषणाकडे लक्षं लागलं होतं. पंतप्रधानांनी भारताचा गौरवाशाली इतिहास सांगत देशाच्या प्रगतीचा धावता आढावाही घेतला.

आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनांचीही माहिती दिली. डिजीटल इंडियाचाही संकल्प त्यांनी आपल्या भाषणातून मांडला. देशवासियांच्या अपेक्षांपूर्तीसाठी आपलं सरकार यापुढे प्रयत्नशील राहिल असंही ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून जागतिक पातळीवरही आपली अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. जीएसटी, हमीभाव, मुद्रा योजना, स्टार्टअप, सोलार फार्मिंग, या मुद्द्यांचाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. एनडीएच्या काळात देशाने सर्वच क्षेत्रात दुप्पट वेगाने प्रगती केल्याचा दावाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.

पंतप्रधानांच्या भाषणातील १५ ठळक मुद्दे

 • जागतिक अर्थव्यवस्थेत भारत सहाव्या स्थानावर विराजमान
 • Loading...

 • भारताची 'डिजिटल इंडिया'कडे वेगाने वाटचाल
 • एनडीएच्या काळात देशाची आर्थिक आणि कृषी क्षेत्रात दुप्पट वेगाने प्रगती
 • बँकिंग सेक्टरमध्ये दिवाळखोरीचा कठोर कायदा आणला
 • मुद्रा लोन योजनेत उत्तम कामगिरी
 • न गाली से न गोली से, काश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से
 • भारत मल्टी बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे केंद्र
 • देशातील छोट्या गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये स्टार्टपची कामे सुरू झाली
 • पुढच्या ३० वर्षांपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणार
 • सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला
 • करदात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ
 • मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश
 • जन आरोग्य योजनेत ५ लाखांचा विमा
 • जीएसटीमुळे देशातील व्यापाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला
 • तिहेरी तलाक कायद्याला काही जणांचा विरोध, मात्र तो कायदा होणारच

मोदी सरकारचा मोठा उपक्रम, १५० रुपये गुंतवून मिळवा २५ लाख रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2018 10:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close