मोदींचा दणका : Work From Home ला बंदी; 9.30 ला ऑफिसमध्ये हजर राहण्याचं फर्मान

मोदींचा दणका : Work From Home ला बंदी; 9.30 ला ऑफिसमध्ये हजर राहण्याचं फर्मान

Work From Home करणाऱ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दणका दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. यामध्ये आता मंत्र्यांना देखील नरेंद्र मोदी यांनी दणका दिला आहे. सर्व मंत्र्यांनी सकाळी 9.30 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. शिवाय, घरून काम करणं बंद करा असे आदेश देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात बाहेरचे दौरे करू नयेत असे आदेश  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा या उद्देशानं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे आता घरी बसून काम करणाऱ्या, अधिवेशनादरम्यान संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांना चाप बसणार आहे.

Budget 2019 : घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार घेऊ शकते हा निर्णय

नरेंद्र मोदी करतात 15तासापेक्षा जास्त काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर कामाचा सपाटा लावला. ते स्वत: 15 तासापेक्षा देखील जास्त काम करतात. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी मी केवळ 4 ते 5 तासाची झोप घेतो असं म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयात देखील नरेंद्र मोदी वेळेवर हजर राहून काम करतात. तर,

पारदर्शी कारभाराचा नारा

लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. यावेळी त्यांनी पारदर्शी कारभारावर भर देणार असल्याचं म्हटलं आहे. 2014मध्ये शपथ घेतल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले होते. तसेच निर्णय नरेंद्र मोदी आता देखील घेताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं 300 पेक्षा जास्त जागांवर तर, NDAनं 350 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे.

ताडोबामध्ये 4 बछड्यांच्या डौलदार लीला, VIDEO व्हायरल

First published: June 13, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading