परीक्षा ही केवळ जीवनातील महत्त्वपूर्ण पायरी, संपूर्ण जीवन नव्हे – नरेंद्र मोदी

परीक्षा ही केवळ जीवनातील महत्त्वपूर्ण पायरी, संपूर्ण जीवन नव्हे – नरेंद्र मोदी

परीक्षा महत्त्वाची, मात्र परीक्षाच जीवन आहे, या विचारातून बाहेर यायला हवं

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात देशभरातील विविध विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी त्यांना प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांची उदाहरणं देऊन प्रेरित केले. या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि त्यांना प्रश्न विचाण्याची संधी मिळाली आहे.

परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. मी तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि तुमच्या आईवडीलांचंही ओझं मी कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून 'परीक्षा पे चर्चा' असे कार्यक्रम घेणं माझी जबाबदारी असल्याचं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत परीक्षेतील गुणांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे. सध्या गुण हा परीक्षेचा मापदंड बनला आहे. मात्र परीक्षा ही केवळ एक महत्त्वपूर्ण पायरी आहे, संपूर्ण जीवन नव्हे. गुणांना अधिक महत्व देणं किंवा परीक्षा ही केवळ गुणांचा विचार करुन देणं चुकीचं आहे. सध्या तुम्हाला कोणतंही क्षेत्र खुलं आहे. शेतकरी जरी फार शिक्षित नसला तरी तो आपल्या अनुभवाने, मेहनतीने शिकतो व जीवन समृद्ध करतो. परीक्षा महत्त्वाची, मात्र परीक्षाच जीवन आहे, या विचारातून बाहेर यायला हवं; असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.

2011 मध्य़े कलकत्ता येथे भारत-ऑस्ट्रेलियातील क्रिकेट सामन्यातील भारत संघाची परिस्थिती वाईट झाली होती. ते सामना जिंकण अवघड होतं. मात्र यावेळी राहुल द्रविड व व्हि.व्हि.एस लक्ष्मण यांनी चांगली खेळी खेळत परिस्थिती बदलून टाकली आणि तो सामना जिंकला. तुमचा संकल्प ठरला असेल तर निराशाजनक विचार वा भावना तुम्हाला मागे खेचू शकत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायला हवा. 2002 मध्येही भारताची टीम वेस्ट इंडिजसोबत खेळत होती. यावेळी सामन्यादरम्यान अनिल  कुंबळेला दुखापत झाली होती. मात्र दुखापत झाली असतानाही तो डगमगला नाही. भारताला जिंकून देणं ही आपली जबाबदारी समजून खेळला. मैदानात उतरला. त्यावेळी ब्रायन लाराची विकेट घेणं अवघड होतं. मात्र अशा परिस्थितीतही त्याने लाराची विकेट घेतली. एका व्यक्तीचा संकल्प इतरांना प्रेरणा देऊ शकतो, हे या उदाहरणावरुन दिसते, असे मोदी यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात मोदींनी मार्गदर्शन केले. भारतातील तब्बल 2 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. HRD Ministry ने MyGovच्या संयुक्त विद्यमाने पाच विविध विषयांवर 9 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले. या निबंध स्पर्धेतील 1,050 विद्यार्थ्यांची निव़ड परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी करण्यात आली.

पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ मधील महत्त्वाचे मुद्दे

- काळ बदलतो आहे. आताची मुलं परीक्षेचं गुणांकन आपल्या कामाचं मूल्यमापन करत नाही. कोणतीही एक परिक्षा म्हणजे जीवन नव्हे.

- राहुल द्रविड आणि लक्ष्मणने निकराची झुंज दिली आणि तो सामना जिंकला त्यामुळे लक्षास असूद्या की आपण अपयशातूनही यशाचा मार्ग शिकतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशातही यशाची गुरुकिल्ली मिळते.

- वाईट मूडसाठी बाहेरचे घटक कारणीभूत आहेत. तरुणाईचा मूड वाईट असता कामा नये.

- तरुणांच्या कल्पनाशक्तीनेच भारत आणखी प्रगती करू शकेल

- 2020 ही एका नव्या दशकाची सुरवात झाली आहे. विद्यार्थी आणि आपला देश या दोघांसाठी हे दशक महत्तवपूर्ण आहे.

- आपल्याला शिक्षणाची नवी दारं खुली झाली आहेत

- विद्यार्थ्यांवर चांगले गुण मिळवण्यासाठी दबाव टाकू नका

First published: January 20, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या