News18 Lokmat

खूप सहन केला दहशतवाद आता घरात घुसून मारू - नरेंद्र मोदी

'मला सत्तेची पर्वा नाही, देशाची चिंता आहे. पण विरोधकांनी लष्कराच्या शौर्यावर आणि बलिदानावर प्रश्नचिन्हं उपस्थित करू नये. शिव्या द्यायच्या असतील तर मला द्या, पण लष्कराला देऊ नका, असं मोदी म्हणाले.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 10:25 PM IST

खूप सहन केला दहशतवाद आता घरात घुसून मारू - नरेंद्र मोदी

अहमदाबाद, 04 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा बुरखा घातलेल्या पाकिस्तानला सक्त ताकीद दिली आहे. ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. 'भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानला आता घरात घुसून मारू' असा थेट आणि कठोर इशारा मोदींनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यात पाकिस्तानकडून वारंवार नियमांचं उल्लंघन करत कुरापती केल्या जात आहेत. त्यावर 'आम्ही खूप सहन केलं पण आता शत्रूला घरात घुसून मारू' असं मोदी म्हणाले.

'मला सत्तेची पर्वा नाही, देशाची चिंता आहे. पण विरोधकांनी लष्कराच्या शौर्यावर आणि बलिदानावर प्रश्नचिन्हं उपस्थित करू नये. शिव्या द्यायच्या असतील तर मला द्या, पण लष्कराला देऊ नका' असंही ते म्हणाले.Loading...


'गेल्या 40 वर्षांपासून भारत दहशतवादाला सहन करत आहे. पण मतांच्या पेटीत अडकलेल्या राजकारण्यांनी त्यावर कोणतीही पाऊलं उचललं नाही' असं म्हणत आगामी लोकसभेच्या मैदानात कसून उतरलेल्या काँग्रेसवर मोदींनी बाण सोडला.
ते पुढे म्हणाले की, 'मला सत्तेची काळजी नाही आहे. मला माझ्या देशाची काळजी आहे. देशातल्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता दहशतवाद सहन करू शकत नाही. घरात घुसून बदला घेण्याच्या तयारीत मी आहे. दहशतवादी पाताळात जरी लपले तरी त्यांना सोडणार नाही' असा थेट इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला आहे.

दरम्यान, अहमदाबादच्या या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक भूमिकेत दिसून आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...