नवी दिल्ली, 24 एप्रिल : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मोदींनी आपलं काम आणि खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. यामध्ये मोदींनी त्यांना आवडणाऱ्या गाण्यांचाही उल्लेख केला आहे.
सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं 'ज्योति कलश छलके' आणि लतादीदींचंच 'ओ पवन वेग से उड़ने वाले घोड़े' ही दोन गाणी आपल्याला मनापासून आवडत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीतील मुद्दे
- मी निवृत्तीचा कधी विचारही केला नव्हता
- माझी झोप फार कमी वेळात पूर्ण होते
- मी फार कमी वेळ झोपतो, मी केवळ 3.30 तास झोपतो
- ओबामा माझे चांगले मित्र आहेत
- माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा दीर्घकाळाचा अनुभव आहे
- जबाबदारी हेच माझं जीवन
- आमदार होण्यापूर्वी माझं बॅंकेत खातं नव्हतं
- विरोधकांशी माझे सौहार्दाचे संबंध
- ममता बॅनर्जी मला बंगाली मिठाई पाठवतात
- ममता बॅनर्जी आजही मला कुर्ते पाठवतात
- मी आजही शिकतो आणि शिकवतो
- माझ्या बैठकांमध्ये कुणी मोबाइल फोन आणत नाही
- माझ्या आजूबाजूला मी एक कार्यसंस्कृती तयार करतो
- मी वयाच्या खूप लहानपणी अनेक गोष्टी सोडून दिल्यात
- मी माझा राग कधीच व्यक्त करत नाही, मी शिस्तप्रिय आहे
- मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की मी पंतप्रधान बनेन
- मी एका साध्या घरात जन्माला आलो
- मला लहानपणापासन लष्करात प्रवेश घ्यायचा होता
- लष्कराचा गणवेष मला लहानपणापासून आवडायचा
- लहानपणी पुस्तकं वाचायला मला आवडायचं
- मीम्सच्या कल्पनाशक्तीची मला दाद द्यावीशी वाटते
- मीम्स पाहून मला खूप आनंद होतो
- मी ट्विटर सारखे सोशल माध्यमही पहातो
- बॅगेत कपडे जास्त रहावेत म्हणून छोट्या बाह्यांचे कुर्ते वापरायचो