सेल्सगर्ल ते केंद्रीय मंत्री; मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्र्याचा खडतर प्रवास

सेल्सगर्ल ते केंद्रीय मंत्री; मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्र्याचा खडतर प्रवास

NDA Oath ceremony : निर्मला सीतारामण यांचा प्रवास हा खडतर असाच आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात NDAनं सत्ता मिळवल्यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रिमंडळाबद्दल. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये लक्षवेधी असलेल्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे निर्मला सीतारामण यांचा. मनोहर पर्रिकर यांच्याकडून संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर निर्मला सीतारामण यांची कामगिरी लक्षवेधी राहिली. राफेल प्रकरणात त्यांनी विरोधकांना दिलेलं उत्तर, परतवून लावलेले हल्ले या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा कणखरपणा दिसला. त्यांनी प्रत्येकवेळी सरकारची बाजू ठामपणे मांडली. विरोधकांच्या प्रश्नांना सक्षमपणे उत्तरं दिली. निर्मला सीतारामण यांचा प्रवास हा खडतर असाच आहे. सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री या प्रवासात त्यांनी अनेक चढ उतार पाहिले.

सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री

निर्मला सीतारामण यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांचं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. जेएनयु विद्यापीठातून त्यांनी एमए इकॉनॉमिक्सची डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी एमफिल केलं. त्यांचं लग्न हे डॉक्टर पराकाला प्रभाकर यांच्याशी झाली. जेएनयुमध्ये त्यांची ओळख झाली होती. डॉक्टर प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर निर्मला सीतारामण लंडनमध्ये राहू लागल्या. लंडनमध्ये असताना निर्मला सीतारामण या एका दुकानामध्ये सेल्सगर्लचं काम करत होत्या असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे. त्यानंतर त्यांनी PricewaterhouseCoopersमध्ये सीनिअर मॅनेजरची नोकरी केली.

'या' मंत्र्याचं नव्या यादीत नाव नसल्याने अमित शहांबद्दलचा सस्पेन्स आणखीच वाढला

NCWच्या राहिल्या सदस्या

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निर्मला सीतारामण यांना 2003 ते 2005 या काळात नॅशनल कमीशन फॉर वुमनच्या सदस्या राहिल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू ठामपणे मांडली. त्यानंतर 2014मध्ये भाजप सत्तेत आलं आणि त्यांना कॅबिनेटमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 2016मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या.

देशाच्या पहिल्या संरक्षणमंत्री

गोवामध्ये भाजप सरकार बनवण्यासाठी मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा गोव्यात पाठवण्यात आलं. त्यानंतर 3 सप्टेंबर 2017 रोजी निर्मला सीतारामण या देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री झाल्या.

VIDEO: जीवघेणं धाडस; असं क्राँसिंग करणं पडू शकतं महागात

First published: May 30, 2019, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading