मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा खेळणार नाहीत होळी

मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा खेळणार नाहीत होळी

केरळमधील 3 रुग्णांनंतर आता नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूरमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. राजस्थानच्या जयपूरमधील पर्यटकाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) असल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : जगभरातील तज्ज्ञांकडून मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जगभरात पसरणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपण होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढू नये यासाठी तज्ज्ञांकडून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे टाळण्यासाठी यंदा होळी खेळणार नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी ‘होली मिलन’ कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे मी ठरवले आहे.

'कोरोना'चा धोका वाढला!

केरळमधील 3 रुग्णांनंतर आता नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूरमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. राजस्थानच्या जयपूरमधील पर्यटकाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) असल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

त्यामुळे भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 6 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी केरळमधील पहिले 3 रुग्ण बरे झालेत तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आणखी 6 जणांना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

केंद्र सरकारकडून हेल्पलाईन नंबर आणि नवीन प्रवास नियमावली

कोरोनाव्हासबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या 91-11-23978046 क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मदत मागू शकता, तुमच्या प्रश्नांचं निरसन करू शकता. नाहीतर ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवरही तुम्ही मेसेज करू शकता.

First published: March 4, 2020, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading